पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(८०) सुवर्णाची होती अशी पुराणग्रंथांत वर्णने आहेत. या कुळांत प्रत्यक्ष श्रीकृष्ण अवतरले असें तें कुळ श्रेष्ठ होते, तथापि त्यामध्ये यःकश्चित कारणाने आपसांत कलह वाढून एकमेकांत मारामाऱ्या सुरू झाल्या. त्या मारामारीच्या योगानें सगळे यादव मेले, आणि त्या कुळाचा अगदी निर्वेश झाला. हिंदु व मुसलमान हे आर्य भूमातेचींच लेंकरें असल्यामुळे - त्या उभय जाती एकमेकांची भावंडे होतात. त्यांनी गृहकलहाने ईर्षेस पेटून परस्परांशी तंटे व मारामाऱ्या करणाऱ्या लोकांचे शेवट कसे दुःखास्पद झाले आहेत हे नीट विचार करून पहावे ह्मणजे सध्यां चाललेल्या हिंदु व मुसलमानांच्या भांडणांचा परिणाम किती भयंकर होण्याचा संभव आहे ते कळून येईल. याकरितां उभयतांनी नीट विचार करावा अशी त्यांस हात जोडून प्रार्थना आहे. याविषयी अर्वाचीन कवी काय ह्मणतात ते पहा गाणे भाऊबंदकी-( चाल लावणीची. ) (ह्या गाण्यांत भाऊबंदकीच्या भांडणाचे परिणाम किती वाईट होतात हे दर्शविलें आहे.) भाउबंदकी भांडुनिं झाला कोण सुखी कां आठवितां ॥ कौरव अवघे लयास गेले इतरांची मग काय कथा ॥ धृतराष्ट्राचे शंभर मुलगे राष्ट्र केवढे किति थोरी ।। भीष्म कर्ण हे शूर वीर ते करिती ज्याची सरदारी ॥ राज्यविभागी असून पांडव कौरव भरले व्यर्थ भरीं ॥ करुनि लढाया प्राणा मुकले यांत मिळविलें काय तरी ॥ बांधव मेले वैभव गेले फार दुर्दशा खरोखरी ॥