पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/84

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७९) कानडा ब्राह्मण जवळ होता, त्याच्या द्वारे बाजीरावाने इंग्रज सरकाराशी तह केला. तोच पेशव्याचा शेवटला तहनामा होय. त्या तहनाम्यांत 'बाजीरावाने पेशव्यांच्या गादीवरील आपला हक्क सोडून दिला. कोणाशी आंतून गुप्त मसलत करणार नाही. कोणाशी कांहीं जरूरच पडल्यास इंग्रज सरकारी अधिकाऱ्यांच्या मार्फतीने पत्रव्यवहार करीन असें क. बूल केले. बाजीरावाच्या खासगी खर्चास दरसाल आठ लक्ष रुपये इंग्रज सरकारानें हिस्सेरशी प्रमाणे महिन्याचे महिन्यास द्यावे. आणि सोईस वाटेल अशा भागीरथी नदीच्या तीरी राहण्यास इंग्रजांनी बाजीरावास मोकळीक द्यावी. " अशी तहनाम्यांत मुख्य कलमें होती. याप्रमाणे पेशव्यांच्या गादीचे व मराठी राज्याचे बाजीरावाच्या हातून वाटोळे झाल्यावर बाजीरावास त्याच्या इच्छेवरून ब्रह्मावर्तास इंग्रजी फौजेनें नेऊन पोंचविले. तेथे १८१८ पासून १८५० इसवी सालापर्यंत बाजीरावानें वास करून तो १८५० त मरण पावला. अशा रीतीने मराठ्यांची गादी व पेशवाई बुडाल्यामुळे दक्षिणेतील महाराष्ट्र लोकांची किती हानि व दुर्दशा झाली आहे, तिचा आपण अनुभव घेतच आहो. एवढा अनर्थ व इतकी धूळधाणी होण्यास मुख्य कारण पाहिले तर अज्ञान, व त्यायोगानें आपसांतील तंटेबखेडे व वैर होय. यास्तव आमच्या हिंदुमुसलमान बांधवांनी नीट विचार करून निष्कारण तंटे बखेडे उकरून हाणामाऱ्या करण्याचे व परस्परांत वैर वाढविण्याचे अजून तरी सोडून द्यावे अशी प्रार्थना आहे. यादवांचे कुळ फार श्रेष्ठ त्यांचा पराक्रम काय सांगावा? त्यांची संपत्ति फारच मोठी असे. त्यांची द्वारका नगरी