पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७७) गादीवर बसल्यावर १।२ वर्षे नाना फडणवीस त्याचा कारभारी होता. पण बाजीरावाचा स्वभाव मोठा संशयी व अविश्वासु असल्यामुळे त्याचे नाना फडणविसाशी जमेना. शेवटी शिंद्याकडून नानास कैद करवून अहमदनगरच्या किल्यांत ठेविलें. इतकें झाल्यावर शिंद्यांनी दोन कोट रुपयांचा बाजीरावास तगादा लाविला. त्या रकमेची फेड करण्याकरितां अनेक प्रकारें पैका जमा करण्याचा बाजीरावाने झपाटा चालविला. त्या गर्दीत बहुत लोकांचे सरंजाम इनामगांव जमिनी वगैरे उत्पन्नें विनाकारण जप्त केली. त्यामुळे बाजीरावास बहुत लोक प्रतिकूळ होत चालले. शिवान राज्यकारभाराकडे व प्रजापालनाकडे लक्ष न देतां खासगी शिल्लक वाढविण्याचा बाजीरावास फार नाद लागला. तो पुरा करण्याकरितां आपल्या पदरच्या जाहगीरदार वगैरे फौजबंद लोकांचे सरंजाम व नेमणुका तो भडाभड हिसकून घेऊ लागला. त्या योगाने त्याचा फौजफांटा कमी कमी होऊन त्याच्या जवळ शहाण्या, अनुभवी, इमानी, खानदानी व पोक्त अशा मनुष्यांचा दुष्काळ पडू लागला. आणि त्यांच्या बदला शागिर्दपेशे, हुजरे व पाणके अशा हलक्या लोकांचा भरणा वाढत जाऊन त्यांची त्याजवळ चहा होऊ लागली. तेव्हां अर्थातच ते हलके व नीच लोक मालकाच्या हिताहिताची पर्वा न करतां मर्जी माफक बोलून होस हो देऊ लागले. अशा रीतीने बाजीरावशाहीत अव्यवस्था माजत चालल्यामुळे पेशवाईतील जुन्या खानदानीच्या पिढीजाद इमानी लोकांची वाताहत झाली. शिवाय बाजीरावाची खासगी वर्तणूकही फार निंद्य असल्यामुळे त्याला त्याच्या राज्यांतले सर्व लोक