पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/81

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कुळांत औरस पुरुषसंतति असून दुसऱ्या कुळांतला पुरुष जर तुझी पेशव्यांच्या गादीवर बसवाल तर त्याला आमी मुजरा करणार नाही." असा खडखडित जबाब देऊन नानाफडणविसाची अत्यंत शहाणपणाची व बिकट प्रसंगास योग्य अशी मसलत होती ती हाणून पाडल्यार दौलतराव शिंदा लागलाच उठून आपल्या गोटांत चालता झाला. शिंदा फौजबंद पुण्यांत असल्यामुळे त्याच्या मताविरुद्ध वागण्याची नानास छाती होईना. यामुळे त्याचा अगदी निरुपाय झाला. बाजीरावास गादीवर बसविण्याच्या संबंधाने बाळोजी कुंजराच्या मार्फतीने शिंद्याशी चाललेल्या मसलती, कारस्थाने व बाजीरावाने शिंद्यास देऊ केलेले द्रव्याचे मोठे आमिष पाहून शिंदा त्यास भाळला. ह्या सर्व गोष्टी नानाफडणविसास गुप्तपणे आधीच कळल्या होत्या. त्यावरून शिंदा बाजीरावास पेशव्यांच्या गादीवर खास बसविणार अशी नानाची पक्की खात्री झाली. तेव्हां नानाने असा विचार केला की, दत्तक घेण्याची आपण केलेली मसलत फसली, ती सिद्धीस जात नाही. आणि बाजीरावास पेशव्यांच्या गादीवर बसविण्याचे यश शिंदा घेणार. त्यामुळे आपण दोहींकडूनही फसले जाणार, त्यापेक्षां आतां बाजीरावास गादीवर बसविण्याचे यश तरी कां घालवावें ? आपणच बाजीरावाला गादीवर बसविणे हेच आतां करणे युक्त आहे. असा पोक्त विचार करून त्याने लागलीच परशुराम भाऊ पटवर्धन यांस शिवनेरच्या किल्यावर पाठवून बाजीरावास पुण्यास आणविले. आणि मग मोठ्या सन्मानाने सुमुहूर्तावर बाजीरावास पेशव्यांच्या गादीवर बसविलें. बाजीराव