पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/80

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रमाणे बाळाजी बाजीराव सर्व राज्यकारभार आपमुखत्यारीने करूं लागले, ती वहीवाट आजपर्यंत अव्याहत चालली आहे. प्रत्यक्ष शाहूमहाराजांनी मराठे जातीचा वृथाभिमान न धरितां केवळ मराठ्यांच्या गादीचा अभिमान मनांत बाळगून परजातीचे ब्राह्मण बाळाजी बाजीराव पेशवे यांचे हवाली आपल्या मराठ्यांच्या गादीची पूर्ण सत्ता दिली. तेंच तत्व या वेळी आपण मनांत धरून वागलो तर आपल्याकडे कोणत्याही प्रकारे दोष येणार नाही. शाहूमहाराजांचेंच आपण अनुकरण केले असेंच होणार आहे. हे सर्व मनांत वागवून मी सर्वांस पुनः विनंती करून सांगतों की वर सांगितलेल्या कारणांवरून बाजीरावसाहेब किंवा चिमाजीआपा हे दोघेही पेशव्यांच्या गादीवर बसविण्यास निरुपयोगी आहेत, ह्मणून दुसरा एखादा सुलक्षणी पुरुष ज्याचे योग पेशव्यांच्या गादीवर बसण्यास अनुकूळ असतील असा पाहून त्याला कै० माधवराव पेशव्यांच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक देऊन हे मराठ्यांचे राज्य चालवावें, असें मी सुचवितो. याप्रमाणे नाना फडणविसांनी फार उपयुक्त व अनेक सुविचारांनी परिपूरित असें भाषण करून जमलेल्या दरबारी मंडळीस मत विचारिलें, त्यावरून पुष्कळ थोर थोर मुत्सद्यांनी नानाचे ह्मणण्यास रुकार देऊन आपली संमति दिली. परंतु पेशव्यांच्या गादीवर अनिष्ट ग्रहांची वक्रदृष्टी झाल्यामुळे ते नानाफडणविसाचे शहाणपण कसे चालू देणार ? त्यांनी ती नानाची सयुक्तिक मसलत हाणून पाडण्याकरितां दौलतराव शिंद्याच्या अंगांत संचार करून त्यास पुढे करून त्याच्या तोंडून असें वदविले की, "पेशव्यांच्या