पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/79

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

IFE में । (७४) कोण आहे हे पाहू लागले. परंतु मराठ्यांचे गादीचे रक्षण करण्याजोगा लायक पुरुष त्यांच्या लक्षात येईना. तेव्हां त्यांनी फार पोक्त विचाराने दूर दृष्टी देऊन असा विचार केला की, नालायक अशा मनुष्याच्या हातीं ही मराठ्यांच्या राज्याची सत्ता देऊन आपण देह ठेवून गेल्यास हे राज्य बुडेल. याकरितां माझ्या वंशाचें नांव कायम राहण्याकरितां कोणी तरी मराठ्यांच्या कुलांतला पुरुष आपण दत्तक घ्यावा, आणि आपलें नांव त्याच्या योगानें कायम राहील असें करावें. पण मराठी राज्य चालविण्याचा पूर्ण अधिकार पेशव्यांच्या कुळांतील बाजीराव बल्लाळ पेशव्यांचे पुत्र हल्ली बाळाजी बाजीराव हे आपले पंतप्रधान असून ते मोठे पराक्रमी आणि राजनिष्ठ आहेत, त्यांच्याच हवाली राज्याची सर्व सूत्रे करावी, हेच मराठ्यांच्या गादीचे संरक्षण करण्यास उत्कृष्ट साधन आहे. असे समजून त्यांनी मोठ्या उदारबुद्धीने बाळाजी बाजीराव पेशव्यास आपल्याजवळ बोलावून त्यास मराठ्यांच्या गादीचे संरक्षण करण्याचा बोध करून आपली शिक्केकटार व मोर्तब बाळाजीपंताच्या हवाली केली, आणि त्यास माझ्या दत्तकाचा व त्याच्या पुढील वंशाचाही मानमरातब माझ्याप्रमाणेच राखीत जा; अशी आज्ञा करून त्यास पुढील सर्व व्यवस्था करण्यास सांगितले. त्याप्रमाणे लागलीच त्यांनी सुचविलेल्या पुरुषास महाराजांच्या मांडीवर दत्तक देऊन तें काम पुरे केले. नंतर लौकरच शाहूमहाराज शांत झाले. त्यांच्या पत्नीने सहगमन केले. पुढे महाराजांच्या दत्तकाच्या खर्चास योग्य नेमणूक देऊन त्यांचा मानमरातब पूर्ववत् ठेवून महाराजांच्या आज्ञे