पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/78

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(७३ ) गादीचे हितचिंतक व रक्षक असल्यामुळे बाजीरावसाहेबांस पेशव्यांच्या गादीवर बसविणे इष्ट किंवा अनिष्ट आहे हे जाणून काय करणे तेंच केले पाहिजे. बाजीरावसाहेब पेशव्यांच्या वंशांतले औरस पुरुष आहेत ह्मणून त्यांस गादीवर बसविलें पाहिजे असा आग्रह धरणेंयुक्त नाही. तर पेशव्यांची गादी कायम राहून तिला बळकटी कशी येईल हेच मुख्यत्वेकरून पाहिले पाहिजे. त्या दृष्टीने पाहिले तर बाजीरावसाहेब पेशव्यांच्या गादीवर बसण्यास नालायक दिसतात. ह्मणून त्यांस वर्ज करून पेशव्यांच्या गादीवर बसण्यास सर्व प्रकारांनी जो पुरुष योग्य ठरेल त्यास कै० सवाई माधवराव साहेबांच्या पत्नीच्या मांडीवर दत्तक देऊन त्याला पेशव्यांच्या गादीवर बसवावें. आणि त्याचे सर्वांनी मनोभावाने साह्य करून मराठ्यांच्या गादीचे रक्षण करावे अशी माझी सर्वांस विनंती आहे. पेशव्यांच्या कुळांतली औरस संतति असतां त्यांस सोडून दुसऱ्या परक्या कुळांतला पुरुष आणून पेशव्यांच्या गादीवर बसविण्याची ही नवी चाल कां पाडावी ? असा कोणी आक्षेप घेतील त्यांच्या समजुतीकरतां मागील पन्नास साठ वर्षांचा मराठी राज्यांतला दाखला आमचे परमपूज्य जे कै० शाहू छत्रपती महाराज यांचाच दाखवितों तो पहावा, झणजे आज जें आपण करणार तें अनुचित नसून मागल्या वहिवाटीप्रमाणेच हे कृत्य आहे, त्याहून अगदी भिन्न नाहीं, असें दिसून येईल. शाहू छत्रपती महाराज हे सन १७४९ साली मरणोन्मुख झाले, तेव्हां त्यांस पुत्र नसून आतां आपल्या मराठ्यांच्या गादीवर कोणास बसविलें असतां मराठ्यांच्या गादीचे संरक्षण होईल, हा विचार त्यांच्या मनांत येऊन ते असा पुरुष