पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/77

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ह्मणून शेवटापनः पदर पसरूनानांचे शेवटचे भाव होईल, व मराठ्यांच्या राज्याचा लौकिक व वैभव वाढेल. ह्मणून शेवटी विनंती करतों की, आपण नारायणास अंतर देऊ नका, हे पुनः पदर पसरून मागणे मागतो, त्याची मला भिक्षा द्या. असें माधवरावसाहेबांचे शेवटचे भाषण ऐकून दादासाहेबांनी ते सर्व मान्य केले. आणि ते निष्कपट आहे असे दाखविण्याकरितां त्यांनी श्रीशंकरावरील बिल्वपत्रही उचलून दिले. त्यावरून माधवराव साहेबांची खात्री होऊन लागलीच त्यांनी नारायणरावाचा हात धरून तो दादांच्या हातांत दिला. नंतर माधवरावसाहेब लौकरच शांत झाले. त्यांची पत्नी रमाबाईसाहेब ह्या सती गेल्या. त्यांचे उत्तरकार्य झाल्यावर नारायणरावसाहेब यांस पेशवाईची वस्त्रे मिळून ते पेशव्यांच्या गादीवर बसले. नंतर थोडक्याच दिवसांनी दादासाहेबांनी नारायणरावाचा सुमेरसिंगाच्या हस्तें खून करविला, हे आपण जाणतच आहां. अशा निर्दयपणाने आपल्या सख्ख्या पुतण्याचा घात करणारे जे रघुनाथरावदादा त्यांचेच पुत्र बाजीरावसाहेब व चिमाजीआपा होत. हे एक कारण, व दुसरें कारण असे आहे की, बाजीरावसाहेबांची जन्मपत्रिका व कुंडली चांगल्या ज्योतिषी लोकांस दाखवून त्यांचे ग्रह राज्यावर बसण्यास कसे आहेत, हे विचारिलें. त्यावरून त्यांनीं त्या पत्रिकेचे चांगले परीक्षण करून सांगितले की, 'बाजीराव पेशव्यांच्या गादीवर बसल्यास त्याच्या हातून पेशव्यांची गादी समूळ नष्ट होऊन मराठ्यांचे राज्य बुडेल.' असे त्याचे जन्मकाळचे ग्रह आहेत. यास्तव या कारणाचाही आपणास नीट विचार केला पाहिजे. आपण सर्व मराठ्यांच्या