पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/76

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नारायणरावास पेशवाईच्या गादीवर बसवालच. पण तो अजून लहान आहे. त्याचा स्वभाव भोळा असल्यामुळे त्यास डावपेंच कळणार नाहीत. राज्य मटले झणजे त्याजवर अनेक शत्रूचा डोळा असतो. जरा न्यून पडले की, ते लागलीच त्याजवर कावळ्यासारखी झडप घालून त्याच्या आंगाचे तुकडे तोडण्यास टपलेलेच असतात. त्यांचे युक्तीने व शहाणपणाने निवारण करून त्यांवर मोठी जरब रहावी असे करणे फार कठीण आहे, हे आपण पूर्णपणे जाणतच आहां. पेशव्यांच्या गादीचे मोठे महत्व आपणच वाढविले. शत्रूची हाडे मोडून त्यांस आपणच नरम करून सोडले. दिल्लीस मोठी जरब बसविली. आणि त्याच्याही पलीकडे अफगाणिस्थानच्या सरहद्दीपर्यंत जाऊन तेथे मराठ्यांचा भगवा झेंडा आपणच उभारलात. मराठी फौजेच्या घोड्यांस अटक नदीचें पाणी आपणच पाजलेत. असले शौर्य, एवढा पराक्रम, व दीर्घकाळपर्यंत श्रम करून आपण मराठ्यांच्या राज्याचा विस्तार वाढविलात, हे मला ठाऊक आहे. पण आज असा प्रसंग आला आहे की, नारायणराव गादीवर बसणार त्याला हे कर्म काय ठाऊक? त्याला राज्यकारभाराचा चांगला अनुभव येऊन राज्यकार्यधुरंधरपणा येण्यास बरीच वर्षे लागतील. यास्तव आपण मागे होऊन गेलेल्या सर्व गोष्टी विसरून आमच्या नारायणाचे पुत्रवत् पालन करा. आतां आपल्या घराण्यांत तरी काय, तो तुमाला, आणि तुह्मी त्याला आहांत, यास्तव कोणताही किंतु पोटांत न बाळगतां ह्या पेशव्यांच्या गादीचे आपण रक्षण करा. आपण सरळपणाने वागून नारायणावर प्रेमाची पाखर घालाल तर उभयतांचेही कल्याण