पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/75

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्यावर पडल्यामुळे त्यांस फार मोठी दुखापत झाली. त्यांस पुत्र नाही ह्मणून ते २।३ दिवस जिवंत असतां त्यांच्या मांडीवर दत्तपुत्र देऊन त्याला पेशव्यांच्या गादीवर बसविणे अत्यंत इष्ट होते. व ही गोष्ट अनेक वेळ पेशव्यांच्या गादीचे हितचिंतकांच्या मनांतही आली होती. तथापि सवाई माधवराव साहेब अगदी तरुण २१ वर्षांच्या वयाचे असून ते परमेश्वरकृपेनें जगतील अशी सर्वांस उमेद वाटत होती, त्यामुळे तसली अशुभ गोष्ट ते जिवंत असतां कोणाच्याने बोलवेना. ह्मणूनच आजचा हा प्रसंग सास विचार करण्याकरितां योजिला आहे. कदाचित् कोणी ह्मणतील की, पहिल्या बाजीरावसाहेबांचे नातू ह्मणजे रघुनाथराव दादासाहेबांचे पुत्र बाजीरावसाहेब व चिमाजीआपा हे हयात असून बरेच मोठे झालेले आहेत, त्यांपैकी बाजीरावसाहेब ज्येष्ठ असल्यामुळे त्यांस पेशव्यांच्या गादीवर बसवावें झणजे झाले. ही गोष्ट मला माहीत आहे. व त्याला विशेष अपवाद किंवा दुर्निवार अडचणी नसत्या तर तसे करणे ओघाने व हक्काने आपण सर्वांनी मोठ्या आनंदानें केले असते. पण आपल्या दुर्दैवाने तसे करण्यास फार अडचणी आहेत त्याही विदित करतो. बाजीरावाचे वडील रघुनाथरावदादा व मातुश्री आनंदीबाई यांस आपण जाणतच आहां. थोरले माधवरावसाहेब थेऊर मुक्कामी अगदीं मरणोन्मुख झाले त्या वेळी राघोबादादांस त्यांनी पुण्याहून मुद्दाम थेउरास बोलावून नेले. आणि दादास पदर पसरून व हात जोडून सांगितले की, दादा, आतां मी अगदी थोड्या वेळाचा सोबती असल्यामुळे विनवून सांगतों की, माझ्या पाठीमागें