पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/74

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मातुश्री गंगाबाईची अगदी धूळधाणी करण्याचा घाट बनवून आणिला होता, परंतु परमेश्वरास राघोबाचा कृतघ्नपणा खपला नाहीं, ह्मणूनच गंगाबाईसाहेब गरोदर होत्या त्या प्रसूत होऊन पुत्ररत्न प्रसवल्यामुळे पुनः बाळाजी बाजीराव पेशव्याच्या वंशाकडे गादीचा अधिकार आला. त्या वेळी काय काय संकटे आली, व त्यांचा परिहार करण्यास कोणकोणते गुप्त प्रयत्न करावे लागले हे जाणणारे आजच्या दरबारांत कांहीं गृहस्थ आहेत त्यांस ती वेळ आठवत असेलच. 'सत्यमेव जयते' ह्या वाक्याप्रमाणे सत्याचा जय होऊन असत्याचा पराभव झाला. आणि राघोबादादांनी पेशव्यांच्या गादीवर जे मोठे काहूर उभारलें होतें तें सर्व विरघळून त्यांस पेशव्यांच्या गादीवरील पुरुषाच्या अंकित होऊन रहावे लागले. कै. नारायणरावसाहेबांचे पुत्र सवाई माधवरावसाहेब जन्मल्यापासून त्यांच्या सुदैवाने मरणकालापर्यंत पेशव्यांच्या गादीवर कोणतेही संकट आले नाही. त्यांच्याच भाग्याने आमचे कै० महादजीबावा शिंद्यांसारखे पराक्रमी शूर पुरुष पेशव्यांच्या राजघराण्याचे मुख्य स्तंभ असल्यामुळे त्यांनी उत्तर हिंदुस्थानांत मोठाले पराक्रम करून दिल्लीच्या बादशाही दरबारांत देखील मराठ्यांच्या गादीचें मोठे महत्व वाढविलें. हे तर सर्व जाणतच आहेत. पण त्या वेळचेच आपण असून आज किती संकटांत पडलो आहों हे सांगण्याची गरज नाही. आमचे रणधीर, शूर व मोठे मुत्सदी महादजीबावा शिंदे हे अगोदरच स्वर्गारोहण करण्यास चालते झाले. आणि त्यांच्या मागून आपले पेशव्याच्या गादीचे स्वामी सवाई माधवरावसाहेब आकस्मिक रीतीने तिसऱ्या मजल्यावरून खालच्या चौकांतील हौदांतल्या कारं