पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/73

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कर ह्मणून नानाने त्याला दरबारास बोलाविलें. ठरलेल्यावेळी पड सर्व मंडळी शनवारच्या वाड्यांतील दरबारी दिवाणखान्यांत डा येऊन आपापल्या जागी बसली. दौलतराव शिंदे आणि T सर्जेराव हेही येऊन दाखल झाले. तेव्हां कामास आरंभ झाला. रि नाना फडणविसांनी प्रथम असा उपक्रम केला की कैलासवासी ग शिवाजी महाराजांनी प्रथमारंभी मोठे साहस व पराक्रम करून पर मराठ्यांचे राज्य महाराष्ट्रांत स्थापन केले. त्यांच्या पश्चात् सं भाजी महाराजांच्या अव्यवस्थितपणामुळे राज्यावर मोठे संकट गुदरून १७१८ वर्षे त्याला ग्रहण लागले होते. पण त्याचा शाहू महाराजाच्या विनयवृत्तीने व सौजन्याच्या वागणुकीने न मोक्ष होऊन पुनः साताऱ्यास मराठ्यांची गादी स्थापित झाली. र त्यास कै०बाळाजी विश्वनाथ, पहिले बाजीराव, व बाळाजी बाजीराव पेशवे यांनी साह्य होऊन अत्यंत राजनिष्ठेने मराठ्यांच्या गादीची सेवा केल्यामुळे मराठ्यांच्या राज्याचा विस्तार वाढला. त्यानंतर थोरले माधवराव साहेबांनीही आपल्या शहाणपणा, नीतीनें, व प्रामाणिकपणाने यथान्याय वागून पेशव्यांच्या गादीचे महत्व सोनपतच्या लढाईमुळे जरी कमी झालें होतें तरी पुनः पूर्ववत् त्याची महती वाढविली. पण आपल्या सर्वांच्या दुर्दैवामुळे ते अल्पायु होऊन मरण पावल्यावर नारायणराव साहेबांस पेशव्यांची गादी मिळाली. पण त्यांचे चुलते राघोबादादा ह्यांस राज्यलोभ उत्पन्न होऊन त्यांनी सुमेरसिंगाच्या हातून नारायणरावाचा खून करविला, हे सर्व आपण जाणतच आहां. त्या वेळी मृत पेशव्याच्या घराण्यांतला कोणी पुरुष नसल्यामुळे राघोबादादांनी पेशव्याची गादी बळकावून जुन्या कारकीर्दीतल्या मुख्य मुख्य लोकांची व AHUAdd