पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६७) संकटामुळे नाना फडणवीस घाबरला. ह्मणून माधवराव जिवंत असता त्याच्या मांडीवर दत्तक देण्याची फार जरूर आहे, ही कल्पना त्याला सुचली नाही. होणारासारखी बुद्धि होते त्याला तो काय करतो? पुढे माधवराव मरण पावल्यावर दत्तक घेण्याची किती आवश्यकता होती हे नानाच्या ध्यानात आले. पण ती योग्य वेळ निघून गेल्यामुळे नानाचा निरुपाय झाला. आतां पुढे काय करावें हा नानास मोठा घोर लागला. पण माधवरावाच्या सुतकांत कांहींच करतां येईना ह्मणून मृताचे उत्तरकार्य संपल्यावर नानाने दरबारची त्या वेळी असलेली मुत्सदी मंडळी आपलीशी करून त्याने माधवरावाच्या चौदाव्या दिवशी शनवारच्या वाड्यांत मोठा दरबार भरविला. दौलतराव शिंदा आपल्या मोठ्या फौजेनिशी त्या वेळी पुण्यांत होता, त्याचा सासरा सर्जेराव घाटगा हा शिंद्याचा कारभार पाहत असे. दौलतराव शिंदा अल्पवयी असल्यामुळे त्यानकडे बाजीरावाने गुप्तपणे बाळोजी कुंजराच्या द्वारें 'मला पेशव्यांच्या गादीवर बसवाल तर मी तुझांस दोन कोट रुपये देईन' असे बोलणे लाविलें. तें द्रव्यलोभानें मोहित होऊन शिंद्यानें कबूल केले. महादजीच्या वेळेपासून नाना फडणविसाचे शिंद्याशी वांकडे असल्यामुळे तो दंश शिंद्याचे मनांत आधींपासून होताच, तशांत सवाई माधवराव मे मामुळे व बाजीरावाकडील मोठे आमिष आयतेंच पुढे आल्यामुळे शिंदा अगदी भाळला. आणि त्यायोगाने नानाचा सूड उगविण्यास तो सिद्ध झाला. दौलतराव शिंदा पुण्यांत असल्यामुळे दरबारांत येण्याचे निमंत्रण करणे भाग पडलें,