पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

निजाम यांचे युद्ध झाले. त्या लढाईवर सवाई माधवराव पेशवे व नाना फडणवीस हे जातीने गेले होते. त्या लढाईत निजामाकडील पक्षाचा पूर्ण पराभव झाल्यामुळे निजाम जेरीस येऊन त्याने तहाचे बोलणे लाविले. त्या तहामध्ये उन्मत्तपणाने पेशव्यांची सोंगें आणविणारा जो मशीर उल्मुल्क त्यास पेशव्यांच्या स्वाधीन करून लढाईचा खर्च पेशव्यांस निजामाने द्यावा असे ठरलें. येणेप्रमाणे ही मोहीम आटोपल्यानंतर पेशवेसरकारची स्वारी मोठ्या आनंदाने पुण्यास परत आली. एकंदरीनें सवाई माधवरावाच्या कारकीर्दीत पेशव्यांच्या राज्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आले नाही. सवाई माधवरावाच्या सुदैवाने नाना फडणवीस उत्तम शहाणा कारभारी मिळाल्यामुळे मराठ्यांचा राज्यशकट सुयंत्र चालला होता. पण 'देवस्य चित्रागतिः' ह्या वाक्याप्रमाणे सवाई माधवरावास अनिष्ट ग्रह आल्यामुळे दैवयोग प्रतिकूळ होऊन त्यास चित्तभ्रम झाला. आणि त्यायोगाने त्याने शनवारच्या वाड्यांतील तिसऱ्या मजल्यावरून एकाएकी चौकांत उडी टाकिली. ती हौदांतील कारंजावर पडल्यामुळे माधवरावास फार मोठी दुखापत झाली. त्याच वेदनेने व्याकुळ होऊन सवाई माधवरावाचा अंत झाला. त्या वेळी एवढा शहाणा नाना फडणवीस होता तरी तो चुकला. त्यामुळे मराठी [ राज्यवैभवास तो सर्वस्वी मुकला. सवाई माधवरावास पुत्र इन नसल्यामुळे आतां पेशव्यांच्या गादीवर कोणाला बसवावें दही त्यास चिंता प्राप्त झाली. माधवरावाने उडी टाकल्या- वर तो २।३ दिवस जिवंत होता, तेव्हांच त्याच्या मांडी वर दत्तक द्यायला पाहिजे होता, पण आकस्मिक आलेल्या