पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रघुनाथरावास पेशव्यांच्या स्वाधीन करतेवेळेस इंग्रजांनी सांगितले होते की, "रघुनाथरावाच्या मर्जीस येईल त्या ठिकाणी त्याला ठेवून त्याच्या खासगी खर्चास पुरेशी नेमणूक करून द्यावी." त्याप्रमाणे दादाला विचारितां त्याने अहमदनगर जिल्ह्यांतील कोपरगांव येथे गोदावरी नदीच्या तीरीं राहण्याची इच्छा दर्शविल्याप्रमाणे त्याला तेथे राहण्याची परवानगी देऊन त्याच्या खर्चास पुरेशी मोठी नक्त नेमणूक करून दिली. त्याप्रमाणे रघुनाथराव स्नानसंध्या करीत अखेरपर्यंत तेथेंच राहिला. रघुनाथरावास फार दिवस संतति न झाल्यामुळे त्याने एक दत्तक घेतला होता. त्याचे नांव अमृतराव असें ठेविलें, पण त्यानंतर काही कालाने त्याला लागोपाठ दोन पुत्र झाले. त्यांमध्ये बाजीराव वडील आणि चिमाजीआपा धाकटा होता. रघुनाथराव वृद्ध होऊन वारल्यावर त्याच्या दोन्ही पुत्रांस जुन्नराजवळील शिवनेरी किल्ल्यांत नेऊन ठेविलें. सवाई माधवरावाची कारकीर्द २१ वर्षे चालली. तेवढ्या काळांत पेशव्यांचे राज्य सुरळीत चाललें. उर.. हिंदुस्थानांत महादजी शिंद्याने मराठ्यांचा पुष्कळ दरारा बसवून दिल्लीदरबारांत सुद्धा मराठ्यांचे मोठे वजन वाढविले. दिल्लीदरबारांतून वजीरीची वस्त्रे व नालकी आणून ती मोठ्या समारंभाने महादजीवावाने सवाई माधवरावास दिल्लीपतीच्या तर्फे अर्पण केली. एक वेळ हैदराबादच्या निजामाच्या दरबारांत मशीर उल्मुल्क नांवाचा वजीर असतां त्याने पेशव्यांच्या दरबाराची थट्टा करून सोंगे आणिली अशी खबर पेशव्यांच्या वकिलाने लिहून कळवितांच निजामावर स्वारी करण्याचे ठरून खऱ्यांच्या मुक्कामी पेशवा व