पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/69

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

राहिला. इतक्यांत पुरंदर किल्यावर गंगाबाई प्रसूत होऊन तिला पुत्र झाला. त्यामुळे राज्यकारस्थान रचणाऱ्या मुत्सदी मंडळीस व जुन्या पक्षाकडील सर्व लोकांस परमानंद होऊन, त्यांनी फार मोठा उत्सव केला. पुत्राचे नांव सवाई माधवराव असें ठेविलें. माधवराव नारायण याचे नांवें पेशवाईच्या सनदा, शिक्कामोर्तब, आणि पेशवाईची वस्त्रे सातारचे राजाकडून आणून मोठ्या आनंदानें सवाई माधवरावास पेशव्यांच्या गादीवर बसविलें. माधवराव लहान बालक असल्यामुळे पेशवाईचा सर्व कारभार सखारामबापू व इतर प्रमुख मुत्सदी मंडळीच्या विचाराने बाळाजी जनार्दन भानू ( नाना फडणवीस ) हे करूं लागले. सवाई माधवराव २।३ वर्षांच्या वयाचे होण्याच्या सुमारास इंग्रजांनी रघुनाथरावास मदत देण्याचे कबूल करून फौजेनिशी पुण्यावर स्वारी करण्यासाठी त्यास पाठविले. त्याप्रमाणे तो मुंबईहून निघून बोरघाटच्या रस्त्याने सह्याद्रिपर्वत चढून पुण्याच्या नजीक सुमारे २० मैलांवर वडगांवीं आला. तेथें रघुनाथरावाकडील फौजेस सवाई माधवरावाच्या सैन्याने गांठले. तेव्हां उभयपक्षांची मोठी लढाई झाली. त्यांत रघुनाथरावाकडील फौजेचा पूर्ण राभव झाल्यामुळे इंग्रजांनी रघुनाथरावाचा पक्ष सोडून त्याला शव्यांच्या स्वाधीन केले. आणि आपले सर्व सैन्य परत बईस नेले. याप्रमाणे रघुनाथरावाच्या सर्व कारस्थानाचा वट झाला. ठीकच आहे. अनर्थ्यराघव नाटकांत एके ठिणी झटले आहे, त्याचे तात्पर्य, आर्यान्यायें वागे त्यातें होति पशु-पक्षिही सहाकारी ॥ जातां अपथे सोडी, बंधूही त्रासुनि मनीं भारी ॥