पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हरिपंताला चांगली मसलत देण्याकरितां त्याच्याबरोबर परशुराम भाऊ पटवर्धन व त्रिंबकराव मामा पेठे यांसही दिले. नंतर हरिपंतानें जलदी करून राघोबादादास कोल्हापुरानजीक गांठिले. आणि दादासाहेबाबराबर जी फौज होती त्यांतील मुख्य मुख्य पागे, पथके, वगैरे लोकांस युक्तीने वश करून फडक्याने त्यास आपल्या गोटांत आणिलें. तेव्हां कांहीं तरी फितुरीचा दगा आहे, असें राघोबास वाटून तो फिका पडला. कारण दररोज थोडेबहुत सैन्य दादाला सोडून परत जाई, व हरिपंतास मिळे. अशी त्याला बातमी लागली तेव्हां तर त्याचे धाबे दणाणले. शेवटी आपल्याकडील पुष्कळ सैन्य कमी झाले असे पाहून दुर्बल होत चालल्यामुळे टिपूवर जाण्याचा त्याने आपला बेत रहित केला. आणि आपल्या स्वारीचा पंढरपुराकडे मोर्चा फिरविला, तरी त्याच्या पाठीवर हरिपंत फडक्याचा शह होताच. त्या वाटेमध्ये सांगोलें गांवाजवळ दादांच्या व हरिपंताच्या फौजेचा सामना झाला. त्या वेळी परशुरामभाऊच्या जिवावर बेतली होती, पण शेरताटीच्या आश्रयाने त्याचा बचाव झाला. दादा पंढरपुरास दाखल झाल्यावर पंढरपुरापासून ३।४ मैलांवर कांसेगांव नांवाचें एक गांव आहे तेथें पुनः दोन्ही सैन्यांची खडाजंगी झाली. त्यांत त्रिंबकरावमामा पेठ्यास वर्मी गोळी लागल्यामुळे त्रिंबकराव मरण पावला. पंढरपुरास काही दिवस राहून दादानें कुच केले. आणि तो होळकर, शिंदे, व रणजितसिंग यांजकडे मदत मिळविण्याच्या हेतूने गेला. पण त्यास कोणाकडूनही मदत मिळाली नाही. हा त्याचा प्रयत्न फसल्यामुळे निरुपाय होऊन शेवटीं तो सुरतेस गेला, आणि इंग्रजाच्या आश्रयास