पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६२) फाकड्याने मोठ्याने ओरडून सांगितले की, लौकर दरवाजा उघडा नाही तर दरवाजा फोडतो. असें बोलून दरवाजा फोडण्यास सुरवात केली. तेव्हां कोणी दरवाजा उघडला. मग प्रमुख मंडळी आंत शिरून प्रथम मारेकऱ्यांस पकडले, आणि मग नारायणरावाचा खून झाला असे दृष्टीस पडले. पण करतात काय? त्यांचा अगदी निरुपाय झाला. नंतर नारायणरावाच्या प्रेतास दहन करण्याकरितां स्मशानांत नेलें. तो सर्व विधि आटपल्यावर आणि नारायणरावाचे क्रियाकर्म संपल्यावर नारायणरावास पुत्र नसल्यामुळे राघोबा पेशव्यांच्या गादीवर बसला. राघोबाने हे घोर कृत्य केलेले पाहून सर्वांच्या डोळ्यांत तो खुपू लागला. पुढे काही दिवसांनी नारायणरावाची बायको गंगाबाई ही गरोदर आहे असे समजले. तेव्हां जुन्या मुत्सदी मंडळीस कांहीं धीर आला. राघोबादादा गादीवर बसल्यावर टिपुसुलतानाशी लढाई करण्याचा लौकरच प्रसंग आला. त्या मोहिमीवर जातीने जाण्याचा राघोबाने निश्चय करून तयारी झाल्यावर तो कनाटकाकडे वळला. मग राघोबा पुण्यांत नाही अशी संधी पाहून जुन्या अमदानीतल्या कारभारी मंडळीने राघोबाच्या विरुद्ध राज्यकारस्थान उभारण्याची गुप्त मसलत केली. तिचा बेतबात ठरल्यावर प्रथम नारायणरावाची बायको गं गाबाई गरोदर होती तिला युक्तीने शनवारच्या वाड्याबाहेर हुः काढून मेण्यांत बसवून लागलीच रातोरात तिला नेऊन पुरंदर किल्यावर मोठ्या बंदोबस्तानें ठेविलें. नंतर कांहीं सैन्य जमवून त्याजवर हरिपंत फडके यांस मुख्य सेनारिपती नेमून दादासाहेबाचा पाठलाग करण्यास पाठविलें.