पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पगार आतांचेआतां द्या असा बहाणा करून मोठ्याने आरडत नारायणरावावर वार करण्यास सरसावला. हे पहातांच दगा आहे असे समजून आपला प्राण वाचविण्याकरितां जवळच्याच खोलीत राघोबा पूजा करीत बसला होता त्याकडे जाऊन दीन मुद्रेनें “दादा, मला वांचवा' असें ह्मणून नारायणरावाने त्याला मिठी घातली. पण जिवावर उदार झालेला सुमेरसिंग त्याचे मागें होताच. त्याने राघोबाला साफ सांगितले की, तूं ह्याला सोडणार नाहीस तर तुलाही मारतों. असें ऐकतांच राघोबाने नारायणरावाला पलीकडे लोटून आपण शेजारच्या गच्चीवर निघून गेला. राघोबाच्या बसण्याच्या खोलीत त्यांची पूजेची गाय होती तिच्या पोटाखालीं नारायणराव प्राणरक्षणार्थ जाऊन पालथा पडला हे पाहून त्याचा स्वामिभक्त हुजऱ्या चापाजी टिळेकर जवळ होता त्याने मालकाचा प्राण वांचावा ह्मणून तो जलदी करून नारायणरावाच्या पाठीवर जाऊन पालथा पडला! इतके झाले तरी त्या दुष्ट राक्षसाने मोठ्या जोराने त्या बिचाऱ्या गाईवर वार केला त्या योगाने ती गाय, चापाजी टिळेकर व नारायणराव ह्या तिघांच्याही शरीरांचे तुकडे झाले. नंतर आणखी वार करून त्या सर्वांचे जीव घेतले. काय भयंकर कृत्य हे!!! 'स्त्रीबुद्धिः प्रलयंगतः' ह्या वाक्याप्रमाणे त्या दुष्ट आनंदीबाईच्या कृतीने हा एवढा अनर्थ झाला. ही न मी हां हां ह्मणतां सगळ्या शहरांत पसरली, तेव्हा काय पुसतां जिकडे तिकडे एकच हाहाकार उडाला. शनवारच्या वाड्याजवळ अतिशय गर्दी झाली. पण दरवाज्यास आंतून कडी असल्यामुळे वाड्यांत कोणाचा प्रवेश होईना. तेव्हां मानाजी