पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( १९ ) नाही. त्यास क्षयाची भावना झाली. त्याचा जोर होतां होतां शेवटी त्याने ११ वर्षे पेशवाईचें राज्य करून आपल्या वयाच्या २८ व्या वर्षी पुण्यापासून १० मैलांवर थेऊर मुक्कामी देह ठेविला. असला बहुगुणसंपन्न व प्रजापालक प्रभु भर उमेदीत मरण पावल्यामुळे पेशव्यांच्या सर्व प्रजेस फार खेद झाला. सर्व लोक फार हळहळले. त्याची पत्नी साध्वी रमाबाई ही सती गेली. माधवरावास पुत्र नसल्यामुळे त्याचा धाकटा भाऊ नारायणराव यास पेशवाईची वस्त्रे मिळाली. नारायणराव हा अल्पवयी व साधा पुरुष होता. ह्मणून माधवरावाने आपल्या मरणकाली आपल्या चुलत्यास (राघोबादादास) बोलावून आणिलें, आणि पदर पसरून सांगितले की, दादा, नारायणराव लहान असून फार साधाभोळा आहे, याकरितां आतां आपण मागील गोष्टी मनांत न आणतां कृपा करून मोकळ्या मनाने नारायणरावाचा सांभाळ करा. तुह्मी पोक्त, आमांस वडील व बहुतकाळ पेशवाईच्या राज्याचे आधारस्तंभ आहांच. यास्तव मनांत कोणताहि किंतु न ठेवितां ईश्वरास स्मरून हा राज्यशकट चालवा. इत्यादि अनेक प्रकारे राघोबाची विनवणी करून नारायणरावाचा हात दादासाहेबांच्या हातांत दिला, आणि पुनः बोलला, दादा, नारायणरावाला अंतर न देतां त्याचा सर्वस्वीं सांभाळ करा, असें ह्मणून त्याने प्राण सोडला. माधवरावाचें उत्तरकार्य झाल्यावर सर्व मंडळी पुण्यास आली. नंतर चालीप्रमाणे नारायणरावास सातारच्या राजाकडून पेशवाईची वस्त्रे मिळून नारायणराव पेशव्यांच्या गादीवर बसला. आणि लागलीच त्या भोळ्या नारायणरावाने राघोबाची कैदेतून मोकळीक करून त्यास आपल्या शेजारी शनवारच्याच वाड्यांत