पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- होता तो सहा महिन्यांत मरण पावला. सोनपतच्या लढा ईवर दक्षिणेतील महाराष्ट्र लोकांचाच भरणा फार होता. त्या । सर्वांची प्राणहानि झाल्यामुळे सगळा महाराष्ट्र देश एकदोन । वर्षे रडत होता, तशांत नानासाहेब (बाळाजी बाजीराव) । मेल्यामुळे अधिकच कल्होळ झाला. ह्या सोनपतच्या लढा ईमुळे मराठ्यांच्या सत्तेस व शहाणपणास धक्का बसून जो कमीपणा आला, तो शेवटपर्यंत कधी भरून आलाच नाहीं. गृहकलहानें केवढा नाश होतो, व धक्का बसतो, हे यावरून लक्षात येईल. बाळाजी बाजीराव मरण पावल्यावर त्याचा पुत्र माधवराव बल्लाळ हा पेशवाईच्या गादीवर बसला. तेव्हां तो अल्पवयी केवळ १६।१७ वर्षांचा होता. या कारणाने पेशवाईचा सगळा कारभार रघुनाथराव करीत असे. माधवरावाचा व रघुनाथरावाचा स्वभाव भिन्न असल्यामुळे त्या दोघांचे पटेनासे झाले. शिवाय निजामाशी चाललेल्या लढाईत रघुनाथरावाच्या हातून मोठी चूक झाल्यामुळे त्याजकडील कारभार माधवरावाने काढून घेतला. आणि शनवारवाड्याचे दक्षिणेस (हल्ली बिनिवाल्याचा वाडा आहे त्या जाग्यावर) खासगीवाल्याचा वाडा होता त्यांत रघुनाथरावास नजरकैदेत ठेविलें. माधवराव अल्पवयी होता, तथापि जात्या मोठा शूर, बुद्धिमान् , न्यायी, दूरदृष्टी, दृढनिश्चयी, उद्योगी क प्रजापालक होता. त्याच्या कारकीर्दीत रयतेवरील वेठबेगार बंद झाली. न्यायनिष्ठुरता वाढली. मोठे विद्वान व न्यायी असे प्रसिद्ध जे रामशास्त्री प्रभुणे माहुलीकर, यांस न्यायाधीश नेमिल्यामुळे प्रजेस उत्तम न्याय मिळू लागला; पण महाराष्ट्र लोकांच्या दुर्दैवामुळे माधवरावासारखें रत्न त्यांस फार दिवस लाभले.