पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(६७) षांची व लढाईत लढणाऱ्या शूर पुरुषांपैकी जे हाती लागले त्या सर्व लोकांची शत्रूनी • कत्तल केली. आणि मराठ्यांकडील बाजारबुणगें, व बायकापोरें जेवढी शत्रूस सांपडली त्या सर्व पुरुषांस गुलाम केले, व बायकांस दासी केल्या. याप्रमाणे सोनपतच्या लढाईचा परिणाम झाला. लढाईतून निघून ने कांहीं थोडे लोक पळत होते, त्यांचा पाठलाग शत्रूचे स्वारांनी करून त्यांतील बहुतेकांचे भाले टोचून प्राण घेतले, आणि त्यांच्या मारांतून जे काही फारच अल्प लोक निसटले, ते भीक मागत अत्यंत संकटाने पुण्यास रडत आले. त्या लढाईत १ लक्ष लोकांची प्राणहानि झाली. व हजारों महाराष्ट्रमनुष्ये दास व दासी झाली! !! __ ही लढाईची अत्यंत दुःखकारक वार्ता ऐकून बाळाजी बाजीराव पेशव्याची कंबर खचली. या लढाईचेपायीं पेशव्यांकडील दोन अडीच लाख मनुष्यांचा व कोट्यावधि रुपये किंमतीच्या मालमत्तेचा नाश झाला. बाळाजी पेशव्याचा वडील मुलगा विश्वासराव, व चुलतबंधु सदाशिवरावभाऊ, हे पेशव्यांच्या कुळांतले खासे पुरुष ठार झाले. त्याचप्रमाणे मोठाले प्रतापी, शूरवीर, व रणधीर पुरुषांचा नाश झाला. तेणेकरून बाळाजी बाजीराव पेशव्यास अत्यंत दुःख झाले. त्याने सर्व ऐषआराम व राज्योपभोगांचा त्याग केला. त्याने आपला राहता शनवारचा वाडाही सोडला. आणि उदासवृत्तीने पर्वतीवर जाऊन आयुष्याचे दिवस अति दुःखानें तो कंट्रू लागला. त्यास काही गोड लागेना, व स्वस्थ झोपही येईना. तो चिंताग्रस्त होऊन दिवसेंदिवस क्षीण होऊन अगदीं थकत चालला. असें होतां