पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५६) खल्लास झाले.तेव्हां आतां लौकर लढाई सुरू करून काय होईल तें होऊ द्यावें, अथवा अन्नावांचून उपाशी मरावें अशी वेळ आली. तेव्हां निरुपायास्तव मुसलमान शत्रूशी लढाई सुरू केली. तेव्हां प्रथम कांहीं वेळ जय मिळण्याची चिन्हें दिसत होती. पण मुसलमान लोकही मोठ्या आवेशाने लढू लागले. तेव्हां मराठ्यांच्या सैन्याने कच खाऊन किंचित मागे पाय घेतला. हे पाहून विश्वासराव ऐन गर्दीत शिरला. त्यास गोळी लागून तो पडला. अशी खबर कळतांच सदाशिवराव घोड्यावर बसून मोठ्या आवेशाने लढाईच्या ऐन गर्दीत जाऊ लागला. त्यास शिंदे व होळकर हे अशा गर्दीत तुझी जातीने जाऊं नका, जरा मागेच राहून सैन्यास धीर देत रहा ह्मणजे बरें पडेल. असें अती आग्रहाने सांगत असतां त्यांचे न ऐकतां तो आपला हेका करून ऐन गर्दीत घुसला. आपल्या सैन्यास उत्तेजन येण्यासाठी भिऊ नका, मारा, तोडा, इत्यादि मोठ्या जोराने ओरडून सूचना देत देत जो पुढे गेला तो दिसेनासा झाला. विश्वासराव पडून मरणोन्मुख झाल्यामुळे त्यास रणांतून उचलून मागे आणल्यामुळे लढाईत झुंजणाऱ्या लोकांचे धैर्य खचलेच होते, त्यावर सदाशिवरावाचाही पत्ता लागेनासा झाल्यामुळे मराठ्यांच्या सैन्यांत एकच हाहाकार झाला. हे पाहून शत्रूनी मोठ्या निकराने जोराचा मारा सुरू केला. त्यामुळे मराठ्यांच्या सैन्याचा मोड होऊन ते पळू लागले. हे पाहतांच त्यांनी पाठलाग सुरू केला, तेव्हां जो भयंकर परिणाम झाला तो प्रसिद्धच आहे. त्यांत शिंद्याचे अनेक खासे पुरुष, इब्राहिमखान गार्दी, सागरच्या राजघराण्याचे मूळपुरुष गोविंदपंत बुंदेले, इत्यादि अनेक पुरु