पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्यांची सर्व प्रकारे चांगली सोय करीन. त्यांस कांहीं उणें पडूं देणार नाही. हे लोक परतले झणजे आपण आजुबाजूस सरकण्यास मोकळे होऊ. मग शत्रूस अनेक हुलकावण्या दाखवून त्यांची हाडे मोडण्यास सुलभ पडेल. इत्यादि अनेक प्रकारें मल्हारजी होळकराने सदाशिवरावभाऊंस विनवणी करून सांगितले. पण होणारासारखी बुद्धि. सदाशिवरावभाऊनें त्या पोक्त व लढाईत कसलेल्या शूर मुत्सदी पुरुषाचे झणणे मनास न आणतां उलट त्याचीच निर्भर्त्सना केली. त्याला सदाशिवराव ह्मणाला " तुझी धनगर, तुझांला काय समजतें ? हे मेंढ्या राखण्याचे काम नव्हे." अशा उपमर्दाचे भाषण ऐकून मल्हारजी चुप बसला. करतो काय, सदाशिवराव लढाईच्या कामास नालायख आहे हे पूर्णपणे तो जाणत होता, तरी तो यजमान असल्यामुळे त्याच्यापुढे जास्त बोलतां येईना. " देवस्य चित्रा गतिः” ह्या वाक्याप्रमाणे सदाशिवरावभाऊ वेडेचार करू लागला. त्याप्रमाणे त्यांस लौकर फळेही येऊ लागली. जवळचा खजिना अगदी संपला. त्याची भर करण्याकरितां त्याने दिल्लीस कित्येक अनन्वित कृत्ये करून पोक्त, जुन्या, व दूरदर्शी लोकांची मने दुखविली. त्यामुळे तो सर्वांच्या मर्जीतून उतरला. पुढे तो सोनपतास गेला तेथे आपल्या बराबरच्या फालतु लोकांस राहण्याकरितां जी जागा योजिली होती, तिच्या सभोंवतीं मोठा रुंद व पुष्कळ खोल खंदक खणून त्याच्या आंत त्याने बाजारबुणगें व फालतु लोक वगैरेस ठेविलें. आंत जाण्यायेण्यासाठी खंदकावर लांकडी फळ्यांचा पूल केला होता. अशाप्रकारे बंदोबस्ताने काही दिवस तो तेथें राहिला, पण जवळचा खजिना सरला; व खाण्याचे सामान अगदी