पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/60

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

पला खर्च कमी होईल. आणि प्रसंगी मागे हटण्याची किंवा पळण्याची वेळ आली तर आपणास ह्या लटंबरास संभाळण्याची अडचणही पडणार नाही. हे कृपा करून ऐका. मी बाजीरावाचा शिष्या असल्यामुळे अनेक लढाया पाहिल्या आहेत. मी वृद्ध झालों तरी मला पक्के स्मरत आहे की, बाजीराव साहेबांनी १५।२० स्वाऱ्या हिंदुस्थानांत केल्या. व रघुनाथराव दादासाहेबांनी तर अटकेपर्यंत मराठ्यांचे झेंडे नाचविले. अटकनदीचे पाणी आमच्या मराठ्यांच्या घोड्यांस पाजलें, तें कशाच्या बळावर ह्मणाल तर ह्या खाबू बाजारबुणग्यांच्या नादी न लागतां केवळ सडेस्वारानिशी निःसीम, शूर, व लढवय्ये लोक मात्र बरोबर होते, ह्मणून ते यश संपादन करतां आलें. आतांसारखा फुकटखाऊ माणसांचा घोटाळा बरोबर असता तर काही झाले नसते. पहा, विचार करा. खऱ्या लढाईचा प्रसंग पुढेच आहे, तो केव्हां येईल हा नेम नाही. तो येईपर्यंत ह्या परमुलखी आपणांस रहावें लागेल. लढाई जुंपल्यावर तरी किती दिवस चालेल हा तरी काय नेम आहे ? ह्याकरितां आपल्या लढाऊ सैन्यास पुरण्याजोगी भरपूर सामुग्री आपले जवळ असली पाहिजे. त्याचप्रमाणे खजिनाही मोठा पाहिजे. असलेले सामान व पैका ह्या रिकामटवळ्या लोकांनी खाऊन संपविला तर शिपायांस मग खुराक कोठून देतां देईल ? आतांच ह्या जगड्व्याळ खर्चामुळे आपल्या जवळची रोकड संपत आली आहे, व खाण्याचे सामान व चंदीवैरण दुर्मिळ होण्याचा रंग दिसत आहे. ह्याकरितां माझ्या विनंतीचा अव्हेर न करितां ह्या बाजारबुणग्या वगैरे लोकांस मी सांगतो त्या ठिकाणी परत जाऊं द्या. मी