पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५१) भाषणाचा राग आला आणि तो ह्मणाला की, लढाईचे कामांत बाहेर काय काय अडचणी येतात हे घरांत बसणाऱ्या तुमच्यासारख्या लोकांस काय समजणार? पण एवढ्याने काही झाले नाही. यापुढे स्वारीस जाण्याचा प्रसंग येईल तेव्हां तुझीच जा, आणि शहाणपणाने काय कमाई करून आणतां ती दाखवा ह्मणजे झाले. याप्रमाणे उभयतांची खडाजंगी उडाली. तेव्हां नानासाहेब (बाळाजी बाजीराव पेशवा ) मध्ये पडून त्याने दोघांस उपदेशाच्या चार गोष्टी सांगून शांत केले. तेव्हांपासून रघुनाथराव व सदाशिवरावभाऊ ह्यांची मनें जरा परस्परांच्या विरुद्ध झाली. नंतर लौकरच हैदराबादच्या निजामावर स्वारी करण्याचा प्रसंग आला, तेव्हां त्या लढाईवर जाण्याचे रघुनाथरावाने नाकारले.ह्मणून सेनाधिपत्य स्वीकारून त्या मोहिमेवर सदाशिवराव गेला. तेथे सुदैवाने अल्पकालांत सदाशिवरावास जय मिळून लढाईचा खर्च, चौथाई, सरदेशमुखी, व साहोत्रा ह्या हक्कांची निजामावर चढलेली बाकी निजामाने पेशव्यास देण्याचे कबूल करून तह केला. तेव्हां अर्थातच सदाशिवरावभाऊ फुरफुरला, आणि पुण्यास आल्यावर रघुनाथरावाला लसून त्याचा हिरमोड करण्याच्या हेतूनें मोठ्या गर्वाने बोलला की, "कां दादा, आझी अल्पकालांत लढाईत जय मिळवून कर्ज न करितां पैका घेऊन आलों की नाहीं पहा. नाहीतर तुझी कोट्यावधि रुपये कर्ज करून र र करीत घरी आला तसे तर नाहींना झालें ?" हे सदाशिवरावाचे गर्वोक्तीचे व खोंचून बोललेले भाषण ऐकून रघुनाथराव आपल्या मनांत खजिल होऊन उगीच बसला. यामुळे सदाशिवरावास फार आनंद होऊन स्वर्ग दोन बोटे राहिला