पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(५२) असे वाटून तो आपल्या शहाणपणाच्या घमेंडीत फुगून तुंद झाला. पण ईश्वराची करणी काही विचित्र असते. त्याप्रमाणे थोडक्याच काळांत पंजाबावर ठेवलेल्या सुभेदारास मुसलत मानांनी हांकून लावले, आणि त्याच्या ताब्यांतला पेशव्यांचा र मुलूख त्याजकडून हिसकून घेतला, अशी खबर पुण्याचे दरबारी येऊन धडकली. त्यामुळे अर्थातच तिकडे स्वारी करण्याचा प्रसंग आला. तेव्हां सदाशिवराव गर्वाने फुगलाच होता, तो डौलाने बाळाजी बाजीराव पेशव्यास ह्मणाला की, र ह्या स्वारीवर मी व विश्वासराव जातो. रघुनाथरावाला येथेच ठेवून घ्या. आणि माझें दिवाणगिरीचे काम त्याचे हातून ध्या ह्मणजे झाले. ह्या ह्मणण्यास बाळाजी बाजीरावानें रुकार दिला. त्यावरून सदाशिवरावाने मोठी कडेकोट तयारी केली. त्याने आपल्या स्वारीबरोबर मोठा इतमामी सरंजाम घेतला. दरबाराकरितां एक मोठा भरजरी तंबू तयार करविला. त्याचप्रमाणे इतर सामानही पोक्त व मोठ्या भपकेदार डामडौलाचे घेतले. स्वारीबराबर पुष्कळ बायकापोरें घेतली. त्याचप्रमाणे खोगीरभरती बाजारबुणगेंही फार घेतले. त्याला वाटले की, मुसलमान लोकांस मी हां हां ह्मणतां जिंकीन. व राघोबापेक्षा मोठा पराक्रम करून कर्ज न करितां पुष्कळ धनदौलत पुण्यास घेऊन येईन. अशा मनोराज्यांत दंग ह' होऊन मोठ्या उत्साहाने पुष्कळ फौज घेऊन तो हिंदुस्था नाकडे स्वारी करण्यास चालता झाला. त्या बापड्याला लढाईचे मर्म काय ठाऊक ? जसें कोणाकडे डौलाने मेजवानीस जावयाचे तसेंच हिंदुस्थानच्या मोहिमेवर जायचे असा त्याचा समज होता. 'जोवरी पाहिलें नाहीं पंचानना, तोवरि