पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याचा ग्रह झाला. एके दिवशीं शनवारचे वाड्यांत सर्व मंडळी भोजनास बसली असतां पंक्तीत बोलता बोलतां सहज स्वारीतल्या गोष्टी निघाल्या, तेव्हां "मी दोन तीन वर्षांत अमुक अमुक लढाया मारल्या, अमके अमके राजे जिंकले, अमुक राजांवर खंडणी बसविली, व अमका अमका प्रदेश आपल्या राज्यास नवा जोडला" इ. हकीकत रघुनाथरावाने सांगितली. ती ऐकून घरांत बसून चुरचुर बोलणारा सदाशिवराव याने रघुनाथरावास असा प्रश्न केला की, दादा, ह्या मोठमोठ्या बहादुरीच्या गोष्टी तुह्मी सांगतां, त्याप्रमाणे तिकडून कांहीं पैका मिळवून आणलात का ! की काही कर्जाचेंच ओझें डोक्यावर घेऊन आला. तेवढे सांगा ह्मणजे तुमची बहादुरी काय ती कळेल. हे ऐकून रघुनाथरावाने सांगितले की, आज दोन तीन वर्षे अनेक ठिकाणी पुष्कळ लढायांचे प्रसंग आल्याने खर्च अतिशय लागला. त्यामुळे ऐनजिन्नस द्रव्य बराबर आणतां आलें नाहीं, कांही कर्जच झाले आहे. पण मोठा मुलूख मिळविला आहे; व खंडणीही बरीच बसविली आहे, त्याचे उत्पन्न दरसाल येणार आहे. त्या उत्पन्नांतून लौकरच कर्ज फिटेल, व पुढे बिनखर्ची आपल्यास बरीच मोठी रकम दरसाल मिळू लागेल. हे रघुनाथरावाचे बोलणे ऐकून सदाशिवरावाने राघोबास शाबासकी द्यावयाची ती न देता, उलट त्याची निर्भत्सनाच केली. तो ह्मणाला की, "बाहेर जाणारे लोक पराक्रमाने घरी येतांना कांहीं कमाई करून आणतात, असा संप्रदाय आहे, पण तुझी कमाई न आणतां कर्जाचे टोपले डोक्यावर घेऊन आला. तेव्हां हा आंतबट्ट्याचा रोजगार नाही का झाला ?" तेव्हां रघुनाथरावास ह्या टोचून बोललेल्या सदाशिवरावाच्या