पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४९) सतां लढाईचे कामास आरंभ झाला ह्मणजे अतोनात खर्च करावा लागतो. तेथे अगोदर घरांत बसून केलेल्या अदमासाप्रमाणे चालतां येत नाही, यःकश्चित् कामाप्रीत्यर्थ हजारों रुपये खर्चावें लागतात. हे बाहेर हिंडणाऱ्या व प्रवास करणाऱ्या लोकांस अनेक वेळ कळून आले आहे. घरांत चुलकोंबड्यासारखें बसून राघूसारखे बोलणारे बोलघेवडे असतात, त्यांना सांगितले असतां खरें वाटत नाही. फार कशाला, आमचे राज्यकार्यधुरंधर, इंग्रज लोक मोठे शहाणे, जपून खर्च करणारे, पैपैपर्यंत हिशेब पाहणारे असे कुश आहेत तरी लढाईचे तोंड लागलें झणजे त्यांचीसुद्धा लढाईच्या खर्चापुढे मति मंद होते. ह्या लढाईच्या जगड्व्याळ खर्चापुढे तेसुद्धा अगदी मट्ट्यास येऊन हात टेंकतात. अबीसिनीयाची लहानशी लढाई झाली त्याप्रीत्यर्थ सात आठ कोटि रुपये गारत झाले. सन १८७७।७८ साली अफगाणिस्थानच्या शेरअल्ली अमीराशी लढाई झाली त्यांत २०२१ कोटि रुपयांचा फन्ना उडाला. सन १८५७ सालच्या बंडाची शांतता करण्याप्रीत्यर्थ ज्या लढाया झाल्या, त्यांत ५०६० कोटि रुपये नवें कर्ज काढावे लागले. असे शहाणे राज्यकर्ते जर ह्या लढाईच्या पायीं इतके जेरीस येतात तर रघुनाथरावास मागील अडचणीच्या व गैरसोईच्या काळांत फार खर्च लागला व कर्ज झाले ते गैरवाजवी नव्हते. पण ते घरांत बसून गोष्टी सांगणाऱ्या सदाशिवरावभाऊंस कोठून कळणार ? त्याला वाटले की रघुनाथरावाने जरी मोठा प्रदेश जिंकून पेशव्यांच्या राज्यास जोडला, तरी खर्चाचें धोरण त्यास नीट ठेवितां आले नाही. ह्मणूनच कर्ज झाले, असा