पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व राघोबादादा ह्यांच्यामध्ये सामान्य गोष्टी बोलता बोलतां कलहाची ठिणगी शिरली. त्या योगाने नानासाहेब (बाळाजी बाजीराव तिसरा पेशवा) ह्याच्यासमक्ष त्या दोघांची थोडीशी बोलाचाली झाली. बाळाजी बाजीराव पेशव्याच्या कारकीर्दीत रघुनाथरावदादा सेनापती असे. व सदाशिंवरावभाऊ (चिमाजी आपाचा पुत्र व बाळाजी बाजीराव पेशव्याचा व रघुनाथरावाचा सख्खा चुलत भाऊ) हा दिवाणगिरीचा कारभार करीत असे. यामुळे लढाईवर किंवा नवे मुलुख जिंकून घेण्याकरितां स्वारीस जाण्याचा प्रसंग आला तर रघुनाथरावास जावे लागे. राघोबादादा मोठा शूर, साहसी व पराक्रमी निपजला. त्याचा बाप पहिला बाजीराव हा मेल्यावर उत्तर हिंदुस्थानांतील सर्व स्वाऱ्यांवर रघुनाथरावच मुख्यसेनापती असे. त्याने अनेक लढाया मारून शत्रूस 'दे माय धरणी ठाय' असें करून सोडले. उत्तर हिंदुस्थानांतील मोठा प्रदेश मराठ्यांच्या राज्यास त्यानेच जोडला. पुष्कळ ठिकाणचे राजे जिंकून त्यांस आपले मांडलिक केले. व त्यांजकडून खंडणीही येऊ लागली. उत्तर हिंदुस्थानांत राघोबादादाचा दरारा फार बसला. त्याणे काबूलच्या सरहद्दीपर्यंत जाऊन अटकेपर्यंत मराठ्यांचा अंमल बसविला. त्या वेळी पंजाबांतील लाहोर शहर राघोबाच्या हाती आलें. तें व त्या खालचा मुलूख संभाळण्याकरितां त्याने तेथे आपला एक सुभेदारही ठेविला. एवढी मोठी मोहीम करून पुष्कळ मुलूख मिळविण्यास बहुत फौज ठेवावी लागली. ह्याला तीनचार वर्षे तिकडेसच राहवें लागले द्रव्याचा खर्च फार लागला तो पुरा करण्यासाठी कर्जही बरेच झाले. वास्तविक पाहिले अ