पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गलांत नेहमी वणवे लागतात. तेथे बंब नसतात, व पाणीही दुर्मिळच असते. तेव्हां तेथें झाडांच्या डहाळ्यांचा, रेतीचा, मातीचा व धुरळ्याचा उपयोग करून जंगली लोक अग्निनारायणाची शांति करतात, ह्मणूनच जंगलाचे रक्षण होते, ही गोष्ट शहरवासी जनांस आश्चर्यकारक वाटेल. तथापि जंगली प्रदेशांत ह्याच उपायाने सर्व लोक मोठ्या भागावर पसरलेल्या अग्नीचा थोड्या माणसांनी अल्प कालांत पूर्ण पराभव करून आपल्या रानाचे रक्षण करितात. असो. मोठ्या खेदाची गोष्ट ही आहे की, हा कलह एखाद्या कुटुंबांत, ग्रामांत, राज्यांत, किंवा जातींत शिरला ह्मणजे तो थोर थोर लोकांची अब्रू घेतो. राजांची राज्ये नाहीशी करून धुळीस मिळवितो. कुबेरासारख्या मोठाल्या धनाढ्यास लुटून त्यांस भिकेस लावतो. व गरीबगुरिबांच्या कुटुंबाची वाताहत करून त्यांस देशोधडीस हाकून देतो. किंवा कारागृहांत पोचवून त्यांची फटफजिती करतो. ह्या कलहाग्नीच्या तापाने ह्या दुनयेत आजवर जितके अनर्थ घडले आहेत त्याच्या एक शतांश देखील प्रत्यक्ष अग्निनारायणाकडून घडले नाहीत. प्रत्यक्ष अग्नी एखाद्या ठिकाणी कोपून कोणतीही वस्तु जाळू लागला ह्मणजे तो साक्षात् दिसूं लागतो, पण हा कलहाग्नी इतका प्रखर असून तो अदृश्य असतो. तो कोठे व केव्हां भडकणार आणि त्याचा भडिमार किती दूर पल्यावर जाऊन पोचणार हे कोणास कांहीं कळत नाही, त्याचे कारस्थान अत्यंत गुप्त व अगम्य असते, ह्याचे उदाहरण आपल्यास दाखवितों. पहा-प्रत्यक्ष पेशव्याच्या घरा ग्यांत सदाशिवरावभाऊ