पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केली. त्यानंतर लखनौचे राज्य आपल्या ताब्यात घेऊन त्याची इंग्रजी रीतीप्रमाणे सर्व व्यवस्था लाविली. तात्पर्य, तंट्याच्या पायीं एवढाली मोठी राज्ये सुद्धा पाहतां पाहतां व हां हां ह्मणतां लयास जातात. ह्याचा दंगा करणारांनी नीट विचार करावा. वेडेपणाने हट्टास पेटून उगीच्या उगीच आत्मघात करून घेऊ नये, हे हात जोडून मागणे आहे. बंगाल इलाख्यांतील बंगाल, बहार व ओरिस्मया प्रांतांच्या नबाबाचे राज्य मुसलमान घराण्याकडे होते. त्याची राजधानी मुर्शिदाबाद शहरी होती. इ. स. १७५७ त प्लासीच्या लढाईत क्लेवसाहेबाने नबाबसाहेबांच्या राणीस व जावयास अनुकूल करून घेऊन नबाबाचा पराभव केला आणि तें राज्य इंग्रजी अमलास जोडले. ही गोष्ट चमत्कारिक नव्हे का ? कलह झटला ह्मणजे तो वाईट, त्यांत गृहकलह हा तर अत्यंत घातक मानला आहे. कापसाच्या राशीमध्ये अग्नी पुरून ठेविला ह्मणजे तो केव्हां पेटेल, व किती नाश करील ह्याचा नेम नसतो. तद्वत् गृहकलहाची बारीकशी ठिणगी घरामध्ये धुमसत असली ह्मणजे ती केव्हां भडकेल आणि किती अनर्थ करील ह्याचा सुमार कोणास करता येणार नाही. प्रत्यक्ष अग्नीसुद्धा एखादे वेळ पुरवेल, कारण तो निर्जीव असल्यामुळे पेटलेल्या ठिकाणी व त्याच्या आजुबाजूस त्याजवर खूब पाणी शिंपडले किंवा त्याजवर बारीकरेती टाकून दाबली, अथवा ओल्या झाडाच्या पानांसहित डाहळ्यांनी त्यास झोडपलें ह्मणजे तो जास्त न भडकतां लौकरच विझतो.हे उपाय शहरांत पाण्याचे बंब आणून आपण नेहमी करतो, आणि पेटलेली घरे जास्त भडकू न देतां अग्निनारायणापासून बचावतो. उष्णकाळामध्ये जं