पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गाजत चालली ह्मणजे मुसलमान लोकांनी पुढे सरसावून हिंदूंस .. मारपीट करावी, त्याचप्रमाणे मुसलंमानांची मिरवणूक मारुतीच्या देवालयाजवळून वाजत गाजत चालली झणजे त्यांस । हिंदु लोकांनी अडथळा करावा. अशा कारणाने हिंदु व । मुसलमानांमध्ये तंटेबखेडे व मारामाऱ्या नेहमी होत. व तेथील इंग्लिश रेसिडेंटाकडेही त्याबद्दल बोभाटे जात. त्यामुळे असल्या दांडगाव्याच्या खबरा रेसिडेंटाच्या मार्फतीने गव्हरनर जनरल साहेबांपर्यंत पोचत असत. असें होतां होतां लार्ड डलहौसी साहेबांच्या कारकीर्दीत सन १८५४।५५ सालाच्या सुमारास मिरवणुकीच्या संबंधाने अशीच हिंदु व मुसलमानांमध्ये एक मोठी मारामारी झाली. नेहमीच्या चालीप्रमाणे तिची खबर रेसिडेंट साहेबांच्या द्वारें लाट गव्हर्नर जनरल साहेबांकडे जाऊन थडकली. तेव्हां त्या गोष्टीबद्दल लाट साहेबांच्या कौन्सिलांत बरीच वाटाघाट झाली. शेवटी लाट साहेबांनी असा ठराव केला की, "लखनौच्या नबाबास राज्य करितां येत नसल्यामुळे त्याच्या मुलखांतील प्रजेवर फार जुलूम होतो. तो बंद करून प्रजेस सुरक्षित ठेवणे हे इंग्रज सरकारचे कर्तव्य आहे. ह्मणून लखनौच्या नबाबास पदच्युत करून ते राज्य इंग्रज सरकारच्या राज्यास जोडावें, आणि नबाब साहेबांस खासगी खर्चाकरितां नेमणूक करून द्यावी." हा लाट साहेबांनी केलेला ठराव अमलांत आणण्याकरितां बरोबर मोठी फौज देऊन कर्नल औटराम साहेबांची लखनौकडे रवानगी केली. त्याप्रमाणे कर्नल साहेब लखनौस जाऊन पोंचतांच प्रथम नबाब साहेबांस धरून मोठ्या बंदोबस्तानें कलकत्त्यास त्यांची रवानगी