पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४४) वेडाने त्याने बहुत धुमश्चक्री मांडल्यामुळे पुष्कळ लोक बिथरले. आणि त्याची जुलमी सत्ता फेंकून देऊन त्याचा सूड उगविण्यास जिवावर उदार होऊन सिद्ध झाले. त्यामुळे अनेक ठिकाणी बंडे होऊन मुसलमान लोकांच्या सत्तेस कीड लागत चालली. असें होतां होतां दक्षिणेकडील हिंदुधर्मी मराठ्यांनी मोठ्या जोराने लढून त्याचा पुष्कळ मुलूख हिरावून घेतला. त्याचप्रमाणे पंजाबाकडील शीख लोक संतापून आपल्या पंथाची वृद्धि केली, आणि दिल्लीच्या पश्चिमेकडील मुसलमान लोकांच्या राज्यास ग्रहण लावून त्यांनी पंजाबांत आपले राज्य स्थापन केले. याप्रमाणे दक्षिणेकडून मराठ्यांचा व पश्चिमेकडून शीख लोकांचा आवेशाने जोराचा मार बसतां बसतां मुसलमानी राज्याची सत्ता कमी कमी होऊन शेवटी तें राज्य लयास गेले. तात्पर्य, धर्माच्या दुराग्रहानें तंटे उपस्थित करून भांडणे केल्याचा इतका भयंकर परिणाम झाला !!! ही गोष्ट आलीकडील काळची ह्मणजे दीडशें दोनशे वर्षांची असून इतिहासप्रसिद्ध असल्यामुळे आमचे प्रियकर मुसलमान बांधव ती अद्याप विसरले नसतील. आतां चालू शतकांतलें ताजे उदाहरण पहा. अयोध्येच्या नबाबाचे राज्य दक्षिणेतील निजामसरकारच्या राज्यासारखे मोठे होते. तें मुसलमान जातीच्या घराण्याकडे चालत असून त्याची राजधानी 'लखनौ' शहरी असे. पुष्कळ वर्षे तें राज्य सुरळीत चालले होते. पण लखनौ शहरांत प्रसिद्ध रस्त्यावर हिंदु लोकांच्या मारुतीचे प्रसिद्ध देवालय होते. त्याचप्रमाणे त्या रस्त्यावर मुसलमानी धर्माच्या मशिदी होत्या. हिंदु लोकांची एकादी मिरवणूक मशिदीजवळून वाजत