पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ४१ ) सीतादेवी हिच्यासहित अरण्यवास भोगीत होता. सीतादेवी अत्यंत रूपवान असल्यामुळे तिला पाहतांच रावण मोहित झाला. आणि त्याच्या मनांत तिजविषयीं पापवासना उत्पन्न झाली. तो मोठा शहाणा व विद्वान असल्यामुळे त्याने वेदांची खंडे केली. एवढा तो ज्ञानसंपन्न, पराक्रमी आणि संततीने व संपत्तीने परिपूर्ण होता तरी तो कामवासनेने व्याप्त झाल्यामुळे अगदी वेडा बनला. तेव्हां त्याने कपटरूप धरून रामचंद्र आश्रमांत नसतां कपटानें सीतादेवीस हरण करून तिला लंकेंत नेऊन ठेविलें. परधनावर व परस्त्रीवर वांकडी नजर ठेवणारास परमेश्वर लौकर शासन करितो त्या न्यायाने परमेश्वराने मनुष्यांच्या व वानरांच्या हातून त्या रावगदैत्याचा सर्वस्वी नाश केला. त्याची संतति फारच मोठी होती, ती सर्व लयास जाऊन त्याचा अगदी कुलक्षय झाला. त्याचा धाकटा भाऊ बिभीषण या नांवाचा होता तो ईश्वरभक्त असल्यामुळे तो मात्र वांचला. रावणाच्या पश्चात् लंकेचे राज्य बिभीषणासच मिळाले. ही कथा रामायण ग्रंथांत व रामविजयांत विस्ताराने कथन केली आहे. सारांश भांडणानें कोणाचेही कल्याण होत नाही, नाशच होतो. ह्या कथा प्राचीनकाळच्या आहेत. पण आलीकडील काळाकडे पाहिले तरी भांडणाचा परिणाम नाशकारकच झाला अशी उदाहरणे पुष्कळ घडली आहेत. दिल्लीच्या बादशाही तक्तावर जे राजे बसले त्यांत औरं. गजेब या नांवाचा एक बादशहा होऊन गेला, तो मोठा शूर व प्रतापी होता. त्याने आपल्या पराक्रमाने दक्षिणेस रामेश्वरापासून उत्तरेस हिमालयापर्यंत, व पूर्वेस ब्रह्मपुत्रनदापासून