पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(४२) तों पश्चिमेस सिंधुनदापर्यंत हिंदुस्थान देशाचा सर्व भाग जिंकून त्याचा तो सार्वभौम सत्ताधीश झाला. तो स्वभावाने फार क्रूर व जुलमी असल्यामुळे त्याचा दरारा फार असे. परधर्मातले लोक जुलमाने बाटवून त्यांस मुसलमानी धर्मात आणण्याची त्याला फार हांव सुटली. सगळ्या धर्मामध्ये शुद्ध व पवित्र असा काय तो महंमदीधर्म, त्याखेरीज इतर सर्व धर्म झूट. अन्य धर्माने वागून एकनिष्ठेने कितीही उत्तमाचरण करीत असले तरी ते सगळे लोक काफर अशी त्याची समजूत असे. सर्व धर्म मोडून टाकावे, आणि त्या त्या धर्मानुयायी लोकांस युक्तीने किंवा जुलूमजबरदस्तीने बाटवून पवित्र अशा मुसलमानी धर्मात आणावे अशी त्याची फार इच्छा असे. व ती इच्छा पूर्ण करण्याकरितां जेव्हा जेव्हां प्रसंग सांपडे तेव्हां तेव्हां तो तसाच सक्तीने वागत असे. एखाद्या परधर्मी राजाशी लढाई करून त्याचा पराभव झाला ह्मणजे त्या राजास व त्याच्या मुत्सद्यांस कैद करून आणिल्यावर त्यांस महमदी धर्माचा स्वीकार करण्याविषयी आग्रह करी. त्याप्रमाणे मुसलमान होण्यास ते कबूल झाले तर ठीकच. पण त्यांनी नाकारल्यास त्यांजवर जुलूम होत असे. कोणी मुसलमान होत नाही झटल्यास औरंगजेब त्याचा शिरच्छेद करण्यास तयार होई. त्याचा शिरच्छेद करण्यास नागवी तरवार घेऊन मारेकरी गर्दन काटावयास सिद्ध झाल्यावर एका हाताने शेडी धरून व दुसऱ्या हाताने शीर काटण्यास तरवार उभारून त्यास विचारी की 'अद्याप मुसलमान होण्यास कबूल होशील तर जिवदान मीळेल आणि नाही ह्मणशील तर तुझें गर्दन छाटतो.' अशाप्रकारे जिवावर बेतली ह्मणजे