पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोन्ही पक्ष युद्धास प्रवृत्त झाले. एकीकडे पांडव आणि दुसरीकडे कौरव आपापली मोठाली सैन्ये घेऊन रणांत आले, दोन्ही पक्षांकडे रणधीर शूर व युद्धकलानिपुण असे महान् पराक्रमी योद्धे येऊन लढण्यास उभे राहिले. दिल्ली शहराच्या आसपास 'कुरुक्षेत्र' या नावाने प्रसिद्ध असें एक स्थळ आहे, तेथे १८ दिवस त्यांचे युद्ध झाले. त्यासच 'भारती युद्ध' असें ह्मणतात. उभयपक्षांकडील योद्धे जिवावर उदार होऊन मोठ्या निकराने परस्परांशी लढले. शेवटी सत्यप्रिय पांडव ह्यांच्या पक्षाकडे कौरवांपेक्षां सैन्य सुमारें दीडपट कमी होते तरी श्रीकृष्णकृपेने त्यांचा जय झाला. तरी दोन्ही पक्षांचाही नाश फार झाला. युद्धार्थ रणांत आलेले बहुतेक लोक प्राणास मुकले. राहतांपैकीं नांव घेण्यासारखे पांडवपक्षाकडे सात, व कौरवपक्षाकडे तीन, मिळून दहा पुरुष जिवंत राहिले. त्या लढाईस दोन्ही पक्षांमिळून एकंदर १८ अक्षौहिणी ह्मणजे सुमारे ४० लक्ष सैन्य जमा झाले होते. त्यांची तंट्याच्यापायीं राखरांगोळी झाली. ही कथा हिंदूंच्या महाभारत पुराणांत व पांडवप्रताप ग्रंथांत सविस्तर वर्णिली आहे. रावण तरी काय, केवढा पराक्रमी, शहाणा व संपत्तिमान् ! त्या लंकाधीशाने आपल्या पराक्रमाने पृथ्वीवरील सर्व राजे जिंकून सगळी पृथ्वी पादाक्रांत केली. त्याने इंद्रादि सर्व देवांचाही पराभव करून त्यांस आपल्या बंदिखान्यांत टाकिलें. आणि त्यांस आपली हलकी व नीच कामेंही करण्यास लाविलें. अशाप्रकारे तो उन्मत्त व मदांध होऊन अनन्वित कर्मे करण्यास प्रवृत्त झाला. अयोध्यापती श्रीरामचंद्र पितृआज्ञेस्तव आपली पत्नी