पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३९) माजविणारे लोक कोणत्याही नातीचे असले तरी दंगे करणारांस दंग्याच्या योगाने कांहीं लाभ होतो किंवा हानि होते हा विचार उभय पक्षांनीही केलाच पाहिजे. कारण आपण सदासर्वकाळ जे जे उद्योग करितो ते सगळे लाभाच्या आशेनें. आपण केलेल्या श्रमाने व उद्योगाने आपली हानि व्हावी असे कोणी इच्छित व चिंतित नाही. व तशा उद्देशानें कोणी उद्योगही करीत नाही. मनुष्य शहाणा असो किंवा अडाणी असो, आपल्या उद्योगानें हानि न होतां लाभच व्हावा अशी एकंदर मनुष्यमात्राची इच्छा असते, हे सर्वांस कबूल आहे. यास्तव आपणास ह्या दंग्याच्या उद्योगानें कोणता व किती लाभ होतो हे मुख्यत्वे शोधून ते दंगेखोरांचे पुढे ठेविलें पाहिजे, ह्मणजे त्यांचे डोळे चांगले उघडतील. दुर्बळांचे राज्य हिरावून घेऊन आपल्यास लाभ करून घेण्याचे हेतूने लोभी राजे मोठाल्या लढाया उभारतात. त्यांत कचित् प्रसंगी जय मिळतो किंवा समयीं हानिही होते. पण एकंदरीने पाहिले असतां लढाईच्या योगाने दोन्ही पक्षांचा नाश फार होतो. तंट्याचे योगाने आजवर कोणाचें बरें झालें नाहीं असें इतिहास सांगतो. एखाद्या घरांत भावाभावांमध्ये तंटा माजला ह्मणजे तर दोघांचीही फार नुकसानी होऊन उभयतांत वैर वाढते, असें पुष्कळ ठिकाणी अनुभवास आले आहे. कौरव आणि पांडव हे बांधव असून राज्याची वाटणी घेण्याच्या निमित्ताने एकमेकांशी भांडून हातघाईवर आले. सामोपचाराने आपसांत तंटा मिटवावा ह्मणून शहाणे लोकांनी मध्यस्ती करून पुष्कळ प्रयत्न व बोध केला, पण समजूत पडून तंटा मिटेना. यामुळे शेवटी