पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३८) ठिकाणी दंग्यास आरंभ केला असे दिसून येते, ही गोष्ट ध्यानांत धरण्याजोगी आहे. दंगे करणारे लोक तरी कोणत्या प्रकारचे असतात त्याचा बारीक विचार केला तर त्यांत बहुधा उद्योगी, व्यापारी, शहाणे, अब्रूदार व प्रतिष्ठित असे लोक प्रायः नसतात. दंगा माजविणारे लोक निरुद्योगी, आळशी, माथेफिरू, स्वच्छंदी, दरिद्री, व बेपर्वाईने वागणारे असेच बहुतकरून असतात असे दिसून येते. असले अज्ञानी व मूर्ख लोक दंग्यांत शिरून धुमाकूळ घालू लागले झणजे बेफाम होऊन मनःपूत वागून निर्धास्तपणे अनन्वित आचरणे करूं लागतात. अशा प्रसंगी त्यांस उत्तेजन देणारे कळीचे नारद जवळ असले तर दंगे करणारांस शांत न करितां अधिक भर देऊन चढीस लावितात. यामुळे त्यांस जास्त चेव येऊन दांडगाई करण्याचे अधिकाधिक स्फुरण चढते. अशा प्रकारें मत्त होऊन मुसलमान लोक हिंदूंवर घसरले झणजे आपला बचाव करण्याकरितां हिंदु पळून जातात, किंवा दंग्याचे जागी उभे राहून त्यांचा मार चुकविण्याचा प्रयत्न करितात. तथापि हिंदूंत साहस कमी, शांतता जास्त, आणि दुसऱ्या जिवास उपद्रव देण्यांत व कोणत्याही प्राण्याची हत्या करण्यांत महापातक आहे, अशी सर्वत्र दृढ समजूत असल्यामुळे ते नेटाने दांडगाईस प्रवृत्त न होतां बहुधा मागे सरतात, किंवा पळून जातात असे आढळून येते. तथापि एका हाताने टाळी वाजत नाही. टाळी वाजण्यास अधिक उण्या प्रमाणाने तरी दोन्ही हातांचा उपयोग व संयोग होतो, तेव्हांच टाळीचा ध्वनि उमटतो हे कबूल आहे. दंगा उपस्थित करणारे व तो जास्त