पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३७ ) त्यांजवर आणलेला पुरावा फार कच्चा व बनावट दिसल्यामुळे त्यांस कोर्टाने सोडून दिले. तिसरा खटला घोटवडेकर, भट, व रंगारी या तीन गृहस्थांवर करून तोही सेशनकोर्टापुढे नेला होता. त्यांतही पुराव्याच्या न्यूनतेमुळे न्यायमूर्ती जज्ज साहेबांनी अरोपींस निर्दोषी ठरवून सोडून दिले. एका बढायाच्या गणपतीची मूर्ती मुसलमानांनी फोडली असून त्याजवरच खटला करून त्यास १८ महिन्यांची शिक्षा कँटोन्मेंट माजिस्ट्रेटांनी दिली होती, पण अपिलांत निर्दोषी ठरून तो सुटला. याप्रमाणे पुण्यातील तंट्याची समाप्ती झाली. सोलापूर शहरांतील हिंदूंचे एका देवालयांत भजन करीत असतां वाद्ये वाजलीं ह्मणून मुसलमानबांधवांचे पित्त खवळून ते तंटा करण्यास प्रवृत्त झाले. असे अनेक ठिकाणी क्षुल्लक कारणांवरून तंटे उद्भवू लागले. सर्व ठिकाणी दंग्यास आरंभ बहुधा मुसलमानांकडून होतो असें बाहेर आले आहे. आजवर जे तंटे झाले त्यांचे मूळ पाहिले तर हिंदूंच्या मिरवणुकीत मुसलमानांच्या कबरस्थानाजवळ किंवा मशिदीजवळ हिंदूंनी वायें वाजविली अशा सबबी पुढे करून दंगे सुरू झाले. येवल्यास हिंदूंच्या देवळांत मांसाचे तुकडे टाकून रक्ताचे शिंतोडे दिले. त्याचप्रमाणे मुसलमानांच्या मशिदीत कोणी डुकर मारून टाकले. असें निमित्त सांगून दंगे उसळले. मुंबईत आलीकडे एक लहानसा दंगा झाला. त्यास कारण एका आगरी जातीच्या हिंदु स्त्रियेचे प्रेत स्मशानांत नेतांना त्या प्रेतापुढे भजन करीत तें एका मशिदीवरून नेलें. एवढ्याच कारणावरून तेथें दंग्याची सुरवात झाली. तात्पर्य अती अल्प कारणे दाखवून मुसलमान बांधवांनीच बहुतेक