पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३६ ) तुमच्या कल्याणास उत्कृष्ट नौकेप्रमाणे साधन होईल." हा मुसलमान गृहस्थ खेडेगांवांत रहात असून गरीब स्थितीत आहे. त्याने बहुतकाल शिकून बी. ए. किंवा एम. ए. अशा मोठ्या पदव्या मिळविलेल्या नाहीत, तथापि अनुभवज्ञानाच्या बलाने आपल्या बांधवांसच नव्हे, पण एकंदर मनुष्यमात्रांस केलेला बोध फार स्तुत्य आहे. 'जरि उकिरड्यांत पडला मळला न हिरा तथापि सामान्य' ह्या मयूरोक्तीप्रमाणे शहाणपण कोणाच्याही मनांतले असो त्याचा उपयोग प्रसंगी सारखाच होतो. ह्या थोर पुरुषाची मी मनोभावाने स्तुति करतो. वरील उपदेश ऐकून तळेगांवचे हुरळलेले मुसलमान बांधव थंड झाले. त्यानंतर पुणे शहरांत व सातारा जिल्ह्यांतील वाई ह्या गावी अल्प कारणावरून हिंदुमुसलमानांत कटकट झाली त्याबद्दल वाईच्या अब्रूदार तेरा हिंदूंस सातारच्या असिस्टंट माजिस्ट्रेट साहेबांनी २१।२१ दिवसांची तुरुंगाच्या कैदेची शिक्षा दिली. पुण्यास झालेल्या तंट्यांपैकीं नागपंचमीच्या दिवशी नागोबाचा गाडा प्रसिद्ध रस्त्यावर उभा करून रस्ता अडविला, व पोलीसचा हुकूम अमान्य केला असे चार्ज ठेवून बऱ्याच लोकांस दंडाची शिक्षा पुणे सिटी माजिस्ट्रेटांनी दिली. भाद्रपदमासी गणपतीचा मेळा दारूवाल्याच्या पुलावरून रास्त्याच्या वाड्यांत जात किंवा येत असतां, हिंदु मुसलमान लोकांत झालेल्या तंव्यांत १३ असामी सेशन कमिट केले होते त्यांजवर पुरावा न झाल्यामुळे सेशन जजसाहेबांनी त्यांस सोडूनदिले दुसरा खटला श्रीमंत तात्यासाहेब नातूंवर करून त्यासही सेशन कोर्टात उभे केले होते. पण