पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३२) फुगून आपआपल्या कुऱ्यांत सर्वच माणसें वागू लागली तर त्याचा परिणाम काय होईल ? सर्वत्र संकट व नाश. असला दुष्टभाव मनुष्याच्या मनांत कधीच उद्भवू नये, असेंच मी इच्छितो. पण आपल्या शहाणपणाच्या घमेंडींत राहून चवड्यावर ऐटीने चालणारी अशी काही उमेदवार मंडळी आहे, त्यांच्या समजुतीकरितां सांगतो की, वर सांगितल्याप्रमाणे सर्व मनुष्यांची एकमेकांवर रुसवारुसवी होऊन गडी तुटली आणि जो तो केवळ आपल्यासाठीच खपणार, दुसऱ्याकरितां बालाग्र झिजणार नाही अशी फारकत झाली, तर एका घटकेंत काय मौज होईल ती पहा-आई तान्ह्या पोराला पाजणे बंद करील, बायको नवऱ्याचे काम ऐकणार नाही, थोरांच्या घरचे चाकर नोकर, यजमानाकरितां इकडची काडी तिकडे करणार नाहीत, राजाची पालखी वाहणारे भोई जागच्या जागी बसून राहतील, राजाचे हुजरे, शिपाई, व इतर सेवाचाकरी करणारे सर्व लोक आपली कामें तिळभर सुद्धां करीतनासे होतील. आचारी स्वयंपाक न करितां स्वस्थ वसेल. बाजारांतले दुकानदार आपआपली दुकानें बंद करून टाकतील. रेलगाडी हाकणारा ड्रायव्हर एन्जिनाला शिवणार सुद्धा नाही. इत्यादि सर्वप्रकारे मनुष्यांची एकमेकांपासून फ्रांटाफूट झाल्यास ही दुनया चालणार नाही, बुडेल. यःकश्चित् मीठ हा पदार्थ सर्वत्रांस लागतो, पण तो सगळ्या ठिकाणी पिकत नाही. त्याची उत्पत्ती समुद्राचे पाण्यापासून होते व काही ठिकाणी त्याचे डोंगर व खाणी आहेत. आतां वर कल्पना केल्याप्रमाणे माणसें रुसली