पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नका. तसे करण्यांत फार तोटा होणार आहे. आपण त्यांच्या ताटांत किंवा ते आपल्या तगारीत बसून एके ठिकाणी जेवीत नाही, त्याचप्रमाणे आपल्या मुली त्यांच्याकडे किंवा त्यांच्या आपल्याकडे देत घेत नाही. असल्या भेदाबद्दल तुझी त्यांजवर किंवा ते तुमच्यावर रुसत नाहीत हे ठीकच आहे. पण अन्नव्यवहार व बेटीव्यवहाराशिवाय इतर सर्व गो. ष्टीत परस्परांची एकमेकांस पावलोपावली गरज लागणार. असे असून जर आपण हिंदूशीं चुरशीने वागलों तर उभयतांनाही अडचण पडेल. या जगांतला व्यवहार कसा चालतो आपल्या सुखाची वृद्धि व दुःखाची निवृत्ति करण्यास मुख्यत्वे कोणतें तत्व ध्यानांत धरून चाललें पाहिजे, ह्याचा अंमळ खोल विचार करून पाहिल्यास असे दिसून येते की, सर्व मनुष्यांनी एकमेकांशी वैरभाव न धरितां प्रेमाने व प्रामाणिकपणाने वागून आपले काम करावें. कोणाशी विरोध करूं नये. मोठाले धनाढ्य सावकार किंवा राजे लोक आपणाहून फार सुखी असे वाटत असतील, पण सूक्ष्म विचार करून पाहिले तर तुमच्या देखील लक्ष्यांत येईल की, हा केवळ भ्रम आहे. राजांचे व सावकारांचे खरें थोरपण गरीब लोकांवर अवलंबून आहे. त्यांच्या आंगावरच्या भर्जरी पोशाखावर किंवा रत्नजडित अलंकारावर नाही. कल्पना करा की मनुष्ये एकमेकांशी भांडून परस्परांवर रुसली, आणि सवानी असा बेत केला की, मला जे लागेल तें मी स्वतः करीन, दुसऱ्याचें साह्य कदापि घेणार नाही. त्याचप्रमाणे दुसऱ्याचे काम तिळभर सुद्धा करणार नाही. मी स्वतंत्र आहे. मी कोणाचाही चाकर नाही. अशा भ्रामक विचारांनी