पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३३) आणि एकमेकांचा व्यवहार अगदी बंद झाला तर मीठ येण्याचे बंद होईल. त्याचप्रमाणे सर्व पदार्थ मिळणे बंद झाले तर राजापासून रंकापर्यंत सर्वांचे व्यापार व उद्योग बंद पडतील. तेणेकरून सर्वांस फार अडचणींत पडावें लागेल, ह्यात संशय नाही. आपण सर्व मनुष्ये परस्परांशी गोडीने राहून आपल्याच स्वहिताकरितां साक्षात् व परंपरेनें एकमेकांच्या उपयोगी पडतों, ह्मणून सर्वांच्या गरजा भागताहेत, व सुखाची वृद्धि होऊन दुःखाची निवृत्ति होत आहे. पशुपक्ष्यांपेक्षा आपणा मनुष्यांस सुख जास्त होते ह्याचें मुख्य कारण हेच आहे की, आपणास ज्ञान आहे. त्याच्या योगाने सलोख्याने वागून आपण एकमेकांच्या फार उपयोगी पडतो. ह्मणून आझांस सुख जास्त होतें, व तसे त्या अज्ञान पशुपक्ष्यांदिकांस करितां येण्याचे सामर्थ्य व शक्यता नाहीं, ह्मणून त्यांचे सुख मर्यादित झाले आहे. पण मनुष्याचे तसे नाही. ज्ञानबलानें तो शहाणा होऊन जसजसा दुसयाच्या अधिकाधिक उपयोगी पडतो आहे, तसतशी त्याच्या सुखाची वृद्धीच होत आहे. पन्नास वर्षांपूर्वी रेलगाडी व तारायंत्र ह्या देशांत नव्हते तेव्हां दूर ठिकाणची बातमी कळण्यास व लांबचा प्रवास करण्यास फार काळ व अधिक श्रम लागत. पण शहाण्या व उद्योगी माणसांनी खोटा अभिमान टाकून दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याच्या निश्चयानें केवळ अवतारच घेतला. त्या योगाने दुसऱ्याही मनुष्यांची तशी वृत्ति होत गेली. असा संघ वाढतां वाढतां एकलकोंडेपणाची व केवळ स्वार्थाची बुद्धि वाढली होती ती नष्ट होऊन परोपकारबुद्धीचा जोर झाल्यामुळे रेलवे, तारायंत्र, व