पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३०) वहारी लोकांनी तुमच्याच वाईट कृतीमुळे सर्व प्रकारचे व्यवहार तुमच्याशी बंद केल्यास तुझी सर्व प्रकारी अडचणीत पडून तुह्मांला उपाशी मरण्याची पाळी येईल. यास्तव तुह्मीं आपल्याच हिताचा मागला पुढला नीट विचार करून वागाल तर तुमचे कल्याण होईल. आणि तसे न करितां हहास पेटून मूर्खपणाने आडमार्गात शिराल तर तुमच्या पायांत कांटे मोडतील, व तुमचा फार नाश होईल यांत संशय नाही. बाबांनो, पाण्यांत राहून माशाशी व मगराशी वैर केल्यास ते देखील वैयचा घात करितात. मग हिंदुलोक तर शहाणी माणसेंच आहेत. हिंदूंच्या देशांत तुझांला राहणे असेल तर हिंदूंशी वैर न करितां त्यांच्याशी गोडीगुलाबीनेच वागा. उगीच कोणी चढ देऊन तुझांस दांडगाई करण्याची दुष्ट मसलत दिली तर त्या भरंवशावर राहून फसू नका. कारण दाणे टाकून कोंबड्या लढविणारे लोक केवळ मौज पाहाणारे असतात, पण लढाई करणाऱ्यांतून एखादा कोंबडा मेला तर ह्या तमासगिरांचे काय जाणार ? मरणाऱ्याची सागोती करून खायाला ते तयारच. हे तुह्मी कसें नाहीं समजत ? उगीच भरी भरून हूडपणा करू नका. मी तुमच्या हिताची गोष्ट सांगितली त्याबद्दल राग न मा. नितां स्वस्थ चित्ताने नीट विचार करा. तुह्मांस चिथावणारे लोक फार लबाड व स्वार्थसाधु आहेत. त्यांच्या नादी न लागतां त्यांची संगत सोडा. मी तुमचा जातभाई असून हितचिंतक आहे. तुह्मी उमेदीच्या ताठ्यांत राहून हिंदूंशी मगरूरीने वागण्याची किंवा त्यांच्याशी तंटेबखेडे करून मारामारी किंवा शिवीगाळ करण्याची गोष्ट मनांत सुद्धा आणूं