पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२७ ) ईच्या व ठाण्याच्या तुरंगांतील जागाही पुरेनाशी झाली. तेथला दंगा जरा शांत झाल्यावर धरलेल्या आरोपींची चौकशी होऊन शेकडों लोकांस शिक्षा मिळाल्या. मुंबईच्या दंग्याची व आरोपींच्या चौकशीची परिसमाप्ति होते न होते, इतक्यांत नाशिक जिल्ह्यांतील येवलें गांवीं दंगा माजला. तेथे त्यांनी हिंदूचे देवालय जाळळे, व बाजारांतील व्यापाऱ्यांची दुकाने फोडली आणि त्यांतील मालाचा पुष्कळ खराबा केला. त्या दांडगाईबद्दल पोलिसाची धरपकड सुरू झाली, त्यामध्ये तेथले अब्रूदार, धनाढ्य व प्रतिष्ठित असे हिंदु लोक पकडले गेले. त्यांना सेशनकोर्टात चौकशीकरतां उभे केलें, पण पुरावा नसल्यामुळे सेशनकोटर्टाने आरोपी सोडून दिले. त्या कामांत वकील व बारिस्टर वगैरे लोक आणावे लागल्यामुळे लोकांस हजारों रुपये खर्च करावा लागला. येवल्याचे प्रकरण संपतें न संपते इतक्यांत खानदेशांतील रावेर, व कुलाबा जिल्ह्यांतील पेण ह्या गांवीं दंगे माजले. पेणेस तर उद्भवलेल्या दंग्यास कारण अती अल्प होते. रोगाची सांत बंद होण्याकरिता हिंदुलोकांनी आपल्या एका देवालयांत अनुष्ठान केले. त्याच्या समाप्तीच्या अंती अन्नाचा बळी काढावा लागतो; त्याप्रमाणे काढलेला अन्नाचा बळी नेहमींच्या वहिवाटीप्रमाणे मिरवत नेऊन गांववसाहतीच्या बाहेर ठेवण्याकरितां चालविला. तेव्हां मुसलमान लोक मोठ्या जमावाने हातांत काठ्या घेऊन रस्त्यांत आडवे आले. इतकेच करून ते थांबले नाहीत. बळी जाण्याच्या भररस्त्यावर पोलीस अधिकायांच्या व माजिस्ट्रेटच्या देखत एक गाय आडवी पाडून तेथे