पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२६ ) जातीमध्ये इकडे कलह माजल्यास दीड वर्ष झालें. इतक्या कालांत ८।१० गांवी लहान मोठे १२।१४ वेळ तंटे होऊन मारामाऱ्या व कांहीं खूनही झाले. तरी त्याच्या शमनाच्या खऱ्या उपायांची गोष्ट कोणीच बोलत नाही, हे महदाश्चर्य आहे. पहिल्या प्रथम काठेवाडांतील जुनागड संस्थानांतल्या प्रभासपट्टण ह्या गांवीं मोहरमांतील ताजे मिरविण्याच्या वेळी तंटा उपस्थित झाला. तेव्हां ताजे थंडे करण्यास अमुक रस्त्याने न्यावे, असा सरकारी हुकूम असतां त्यांची पायमल्ली करून ते दुसऱ्या भलत्याच रस्त्याने नेले. तेव्हां पोलीस हरकत करूं लागल्यामुळे त्यांस मुसलमानांकडून खरपूस मार मिळाला. हिंदु लोकांची तर त्यांनी खूपच कुंदी काढली. त्या गर्दीत हिंदूंच्या देवालयांत शिरून पुष्कळ नाश केला. आणि तेथल्या पुजारी वगैरे हिंदु लोकांचे खूनही पाडले असें ऐकतो. ह्या घोर कृत्यास आरंभ १८९३ सालच्या मोहरमांत झाला. त्या गोष्टीस एक दोन महिने लोटले नाहीत तोच मुंबईस मुसलमानांनी दीन गाजविण्याची सुरवात . केली. यामुळे त्या मोठ्या व्यापारी शहराचे पुष्कळ नुकसान झाले. व काही लोकांस जबर मार बसून काही लोकांची प्राणहानिही झाली असें ह्मणतात. शांतता करण्यास झटणाऱ्या कांही पोलिसच्या लोकांस मार मिळून दुखापतीही झाल्या. तेथे सतत तीन दिवस हा दंगा चालला होता. दंग्यांत धुमाकूळ घालणाऱ्या लोकांस पोलिसाने पकडले, त्या आरोपींची संख्या सुमारे दोन हजारांजवळजवळ झाली. इतक्या आरोपींस न्याय होईपर्यंत अडकावून ठेवण्यास मुंब