पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२८) तिचा गळा कापण्याची त्यांनी अगदी तयारी केली. गाईची मान तोडण्याकरितां धार पाजविलेला सुरा हातांत घेऊन खाटीक तिच्या मानेजवळ येऊन उभा राहिला. तो आतां तिच्या मानेवर सुऱ्याचा घाव मारणार असें पाहून तेथे जमलेल्या गर्दीतून बंधुभाई कासार गृहस्थ पुढे सरसावला, आणि तो गाईच्या मानेवर आडवा पडून त्याने खाटकास व सर्व मुसलमान मंडळीस विनंती केली की,-गाय आह्मां सर्व हिंदूस पूज्य आहे, असे असतां आह्मां सर्व हिंदूंच्या देखत निष्कारण तिचा गळा कापून तुह्मी प्राण घेणार त्यापेक्षा अगोदर माझा प्राण घ्या, आणि भग पाहिजे ते करा. असे त्याचे निग्रहाचे भाषण व धारिष्ठ पाहून मुसलमान लोक व तो मारेकरी खाटीक चपापले. तेव्हां तेथे हजर असलेल्या माजिस्ट्रेट साहेबांनी व पोलीसच्या अमलदारांनी त्या क्रूरकर्माचा निषेध केला. आणि हिंदु लोकांस समजून सांगून तो बळी दुसऱ्या रस्त्याने नेऊन गांवाबाहेर टाकविला. ह्या गोष्टीस अल्पकाळ लोटला नाही तोच पुणे जिल्ह्यांतील मावळ तालुक्यांत दाभाड्याच्या तळेगांवांतील मुसलमान लोकांनी काहीं कारण उकरून तंटा माजविण्याचा घाट घातला होता. पण तेथील हशमभाई शिकलगार या वृद्ध मुसलमानाने व पोलीसच्या अधिकाऱ्यांनी दंगे करू इच्छिणाऱ्या मुसलमान भाईस बोध करून शांत केले. त्या वेळी त्या वृद्ध व शहाण्या मुसलमान गृहस्थाने केलेला उपदेश फार बोधपर आहे. तो आपल्या मुसलमान बांधवांस ह्मणाला:-'भाईहो तुझी नसत्या कुरापती काढून हिंदु लोकांशी भांडण्याचा व मारामारी करण्याचा हेतु धरिला आहे, पण या कृतीचा दूरवर