पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( २५ ) स्वामीचा शिष्य शहामुनी मुसलमान असून त्याने 'सिद्धांतबोध' या नांवाचा वेदांतविषयावर ओवीबद्ध उत्कृष्ट ग्रंथ लिहिला, तो शके सत्राशेत मौजे चांबळी, तालुके पुरंदर, जिल्हा पुणे येथें समाप्त केला. ह्या पुस्तकाचे अध्याय ६० असून तो शके १७९२ साली मुंबईतील गणपत कृष्णाजी यांच्या छापखान्यांत छापून प्रसिद्ध झाला आहे. हा ग्रंथ फार सुलभ असून मोठा मार्मिक असल्यामुळे वाचणारांनी त्याचे एकवेळ तरी अवलोकन करावे अशी विनंति आहे. . भाग तिसरा. दंग्याची संक्षिप्त हकीगत, व त्याच्या परिणामांची जुनी व नवीं उदाहरणे. प्रस्तुत हिंदु व मुसलमानांमध्ये तेड पडून माजलेला कलह राजकीय नाही. त्यास कित्येक लोक धर्माचे स्वरूप देतात, पण वास्तविक पाहिले तर त्यांत धर्माचाही काही संबंध दिसत नाही. उत्तर हिंदुस्थानांत अनेक ठिकाणी हिंदु मुसलमानांत तंटे होऊन मारामाऱ्या होतात, असें ऐकत होतो, तरी ती गोष्ट एकदेशीय असल्यामुळे त्याची विशेष चौकशी व चर्चा करण्याचे प्रयोजन नव्हते. पण त्या दुष्ट कलहाग्नीच्या ठिणग्या दक्षिणेकडे वळून दुर्दैवाने मुंबई इलाख्यांत अनेक ठिकाणी चेतूं लागल्यामुळे लोकांच्या स्वस्थतेचा भंग होत चालला आहे. ह्या दुष्ट आगीचा अधीक भडका न होऊ देतां त्याची शांती करावी असे प्रयत्न करणे हे हिंदु व मुसलमान लोकांस व सरकार व सरकारी अधिकारी यांसही अत्यंत इष्ट आहे. असे असतां ह्या उभय ३