पान:हिंदु व मुसलमानांत होणारे तंटे व ते बंद करण्याविषयीं विनंति.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२४) विले, आणि नेमलेल्या जागी नेऊन पोंचतें केलें. राहण्याच्या ठिकाणी सर्वांच्या खाण्यापिण्याची चांगली सोय अगोदरच करून ठेविली होती. याप्रमाणे हिंदु लोकांनी आपल्या मुसलमान बांधवांस संकटकाळी साह्य केले, हे सुज्ञ मुसलमान बांधव ध्यानांत धरतीलच. वर दिलेल्या उदाहरणांवरून आमचे मुसलमान बांधव दुराग्रह सोडून शांतपणे विचार करतील तर समजूतदार हिंदु व मुसलमान लोक पूर्वी परस्परांशी कसे वागत होते व आजही कसे वागत आहेत, हे दिसून येण्याजोगे आहे. असे असतां सध्यां दुराग्रहास पेटून हिंदु व मुसलमान लोक परस्परांशी तंटे व मारामाऱ्या करितात. त्या योगाने उभयतांस कांहीं लाभ होतो, किंवा हानि होते, ह्याचा विचार आतां लोकांपुढे ठेवितों, त्याकडे उभयतांनी लक्ष द्यावें, अशी हात जोडून विनंति आहे. हिंदु लोक मुसलमानधर्माच्या देवाची भक्ति करितात, त्याचप्रमाणे कित्येक मुसलमान बांधव हिंदु लोकांच्या देवाची भक्ति करतात अशी उदाहरणे आहेत. कबीर व त्याचा पुत्र कमाल हे दोन्ही पुरुष मुसलमान होते, ते काशी क्षेत्री रहात असत. कबीर हा पूर्ण रामभक्त होता. त्याने परोपकारार्थ भक्तिभावाने जनांस बोध करण्याच्या हेतूने अनेक कविता केल्या, त्यांत पदें फार आहेत. त्यांची अद्यापि प्रसिद्धि आहे. त्याच्या बोधाने लोकांस उपरती होऊन जे त्याचे अनुयायी झाले, त्यांनी एक स्वतंत्र पंथच स्थापिला, त्यास कबीरपंथ असें ह्मणतात. कबीरपंथाचे लोक मुंबई, पुणे व नागपूर बगैरे ठिकाणी बहुत आढळतात. दुसरे उदाहरण, मुनींद्र